पान:गांव-गाडा.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८      गांव-गाडा.


आयतेंच सुटले. स्थलपरत्वें, कालपरत्वे आणि जातिपरत्वे महारकी वतनांत जागलकी, वेसकरकी इत्यादि फोड झाली, आणि महार-मांगांनी आपापली कांही मूळची कामें टाकून दिली, व ती दुसऱ्या जातींनी उचलली. त्यामुळे महार-मांगांचे काम हलकें झालें, आणि रयतेवरील बलुत्याचा बोजा मात्र वाढला. गुजराथेत धेड फक्त मेलेलें ढोर उचलतात, व मेलेली कुत्री, मांजरें भंगी उचलतात. केरसुण्या, शिंकी, कासरे, नाडे, आटणे ( त्यांसाठी ताग आंबाडीचे वाख, दोरखंड, कुणबी आपल्या पदरचे पुरवितात. ), जुंपण्या, वेल्हें, वेठण, मोऱ्हक्या, पिछाड्या, प्रेताची सुतळी, डफ वाजविणे, मरेआईची पूजा, फांशी देणे वगैरे कामें जातिधर्म म्हणन मांग करतात. त्यांतलीही काही कामें उदाहरणार्थ-साळ्यांच्या कुंच्या, शिंकी, कासरे, जुंपण्या, हातळी, पिछाड्या, मोऱ्हक्या वगैरे मांगाने सोडून कंजार, माकडवाले वगैरे जातींच्या गळ्यांत घातली; आणि प्रेताची सुतळी तर बाजारांतून विकत आणावी लागते.

 ओढून नेलेल्या जनावरांची फाड जेथें होते तेथेच त्यांची हाडके पडावयाची. ढोर ओढणे हे महारकीचे मुख्य काम आहे, आणि त्याची फाड महार इनामांत व्हावयाची; म्हणून महार इनामांना हाडकी-हाडोळा ही संज्ञा प्राप्त झाली, व हाडारक्ताचे खत त्यांना अनायासे मिळू लागले. हाडकी-हाडोळ्याच्या जमिनी, व असतील तेथील जागले–इनाम, महार-जागले स्वतः करीत नाहीत. ते त्या कोणातरी कुणब्याला बटाईने लावतात, व काही ठिकाणी त्या गहाण पडलेल्याही दृष्टीस पडतात. हाडकी-हाडोळ्याच्या जमिनी बहुधा फार सरस असतात. तरी महारजागल्यांना इनामाचे उत्पन्न आहे आहे नाहीं नाहीं अशांतले आहे. जागले नेमतांना तालुका पोलीस कुणब्यांकडून लेखी कबुलायत करून घेतात की, मामुलमाणे दर जागल्यास एक शेर तें एक पायली धान्य देत जाऊ. ह्याचप्रमाणे दुकानदारही सालींना प्रत्येकी काही पैसे देण्याचे कबूल करतात. कोठे कोठे दर कुळामागे दरसाल एक रुपया व पेठेतील दुकानामागें आठ आणे रामोसपट्टी ह्मणून जागल्यांना देण्याचा प्रघात आहे. ही वहिवाट पाडण्याच्या व