पान:गांव-गाडा.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२      गांव-गाडा


होत आहेत अशा गांवकीच्या कामाला तोंड देण्यास कामगार वतनी पाटील-कुळकर्ण्यांपैकी फार थोड्यांची तयारी असते. उदाहरण, पीकपाहणीचें पत्रक घ्या. ते काळजीने तयार केलें तर कुळांनाच काय पण सगळ्या देशाला त्याचा उपयोग होईल. हक्कनोंदणीच्या पत्रकामध्ये जमिनीत कोणाचे काय हक्क आहेत हे नोंदून ठेवावयाचे असते. स्थावराच्या दाव्यांत अशिक्षित कुणब्यांना ह्या कागदाचा फार उपयोग आहे. पण ह्या पत्रकाचे तत्त्व व त्याचा उपयोग समजणारे गांवकामगार क्वचित् आढळतात. ब्राह्मणद्वारा गांवे लिहून घेणाऱ्या कुळकर्ण्यांचे प्रमाण बरेच आहे, आणि सुमारे निमा हिस्सा गांवचे कागद तालुका-कारकुनांना पदरचे तेल जाळून मिळवून घ्यावे लागतात. पाटील-कुळकर्ण्यांचे काम बिनचूक व वक्तशीर करून घेण्यांत मामलेदारांना कोण यातायात पडते, हे त्यांनाच विचारावें. इकडे कामाचा विस्तार वाढत चालला आहे; पण अजून बहुतेक पाटील निशाणी नांगर असतात. अक्षरशत्रुत्वाची सबब पुढे करून ते सर्व जबाबदारी कुळकर्ण्यांवर लोटतात. लिहिणारा पाटील असला तरी लेखणी चालविण्यांत त्याला बाट वाटतो. ज्यांत पाटलाला इकडची काडी तिकडे करावी लागत नाही अशीं गांवकीची कामें पुष्कळ दाखवितां येतील. पण ज्यांत कुळकर्ण्याचा मुळीच हात नाही, असें एक देखील काम दाखवितां येणे दुरापास्त आहे. सर्व खात्यांच्या विशेषतः मुलकी फौजदारी खात्यांच्या नानाविध चौकशांचे प्रसंगी पाटील-कुळकर्ण्यांना बिन-भत्त्याने परगांवीं रहावे लागते. लेखी काम कुळकर्ण्यांचे असल्यामुळे पाटील वेळेवर न आला तरी बोभाटा होत नाही, म्हणून पाटलापेक्षां कुळकर्ण्यांचे बाहेर मुक्काम जास्त पडतात, व गांवचे लिहिणे तसेंच तुंबून रहातें; तें कुळकर्णी परत आल्यावर कसेतरी निपटतो. जमाबंदी, सालअखेरचे कागद मिळवणे ह्यांसारख्या प्रसंगी एकट्या कुळकर्ण्यांचे आठ आठ दहा दहा दिवस व हक्कनोंदणीच्या प्रसंगी महिना महिना बाहेर राहणे पडते. इंग्रजात तोंडपाटीलकी मिटून सरस्वतीदान वाढले, आणि तें बहुतके कुळकर्ण्यांला निचरावे लागते. अधिकाऱ्यांपुढे जे काम जातें तें बहुतेक लेखी