पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गर्भलिंगनिदानाविरोधात लेक लाडकी अभियान विविध पातळीवर कार्यरत आहे. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी अतिशय निकडीची आहे. कायद्याचा अर्थ आणि ताकद नीट समजून घेऊन समुचित प्राधिकारी व संबंधित यंत्रणेने त्याची चोख अंमलबजावणी केली तर गुन्हेगारांना पकडण्यात आणि लिंगनिदानाला प्रतिबंध करण्यात निश्चितच यश येऊ शकेल. याच उद्देशाने ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. समुचित प्राधिक-यांप्रमाणेच स्वयंसेवी संस्था संघटनांनाही तिचा निश्चितच उपयोग होईल. -: ५० :