पान:गद्यरत्नमाला.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४
गद्यरत्नमाला.


सांगतात कीं, पांच पौद म्हणजे पन्नास रुपयेपर्यंत एका तिकिटा ची किंमत वाढली होती. खटला चालू करण्याचे वेळेस यानें एक- सारखें चार दिवस भाषण केलें. पुढे खटला सुरू असतांहि बं साहेबानें पुष्कळ वेळ उत्तम भाषणे केलीं. हीं सर्व भाषणे छाप- लेलीं आहेत. वारन हेस्टिंग्स् याच्या पक्षाचे लोक इंग्लंदांत पुष्कळ असल्यामुळे त्यास शिक्षा झाली नाहीं.
 अमेरिकेच्या संबंधानें बर्फ साहेबाने पार्लमेत सभेत जीं भाषण केलीं आहेत तींहि फार उत्तम आहेत. अमेरिकेतील प्रजेस इंग्लं- दांतील प्रजेप्रमाणे वागवावें, पार्लमेंत सभेत प्रतिनिधी पाठवि ण्यास त्यांस अधिकार असावा, त्यांजवर उगाच करांचे ओझें घालू नये, ते इंग्लिश लोकच आहेत, त्यांस स्वतंत्रता म्हणजे काय हैं पूर्णपणे माहीत आहे, आपण त्यांस चरकांत धरूं ला- गलों तर ते मोकळे झाल्याशिवाय राहणार नाहींत, त्यांस आपल्या- शीं भांडण्याचा प्रसंग द्यावा त्यापेक्षां आपणच त्यांस मोकळीक देऊन आपली प्रतिष्ठा ठेवावी यांतच भूषण आहे, त्यांनीं भांडून स्वतंत्रता मिळविल्यावर इंग्लंदाची प्रतिष्ठा राहणार नाहीं; असें बर्क् साहेबाने पार्लमेंत सभेमध्ये पुष्कळ वेळां आपले मत प्रगट केले. बर्क साहेबाच्या मताप्रमाणे इंग्लिश सरकार वागतें तर अमेरिकेतील इंग्लिश लोकांचें राज्य कदाचित् गेलें नसतें. तथापि कित्येक हट्टी प्रधानांनी आग्रह धरल्यामुळे अमेरिकेत छापील कागद, कर वगैरे इंग्लिश सरकाराने सुरू केले. त्यामुळे अमे- रिकन लोकांनी युद्ध करून इंग्लिश लोकांचें जूं फेंकून दिलें, आणि आपण स्वतंत्र झाले.
 बर्क् जसा राज्यकारभारांत पूर्ण हुशार होता, तसाच पहिल्या प्रतीचा विद्वान् व नीतिमान् होता. त्यानें शास्त्रीय विष- यांवर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. सोप्या व सुरस भाषेनें विषय व्यक्त करून दाखविण्याची बर्फ साहेबाची शैली वाखाणण्या- सारखी आहे.