पान:गद्यरत्नमाला.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
एमंद् बर्क्.

१५३


पाहिजे. यावरून पाहतां, एदमंद्र बर्क, या दयाळु इंग्लंदांतील पुरुषाचे सर्व हिंदु लोकांनी उपकार मानावे हें त्यांचे कर्तव्य होय.
 बर्क साहेब मूळचा ऐर्लेदचा राहणारा. तो १७६० च्या सुमारास इंग्लंदांत आला. विद्वत्तेमुळ व सद्गुणांमुळे इंग्लंदांतील त्या वेळचे प्रसिद्ध विद्वान् डाक्टर जान्सन्, ओलिव्हर गोल्दस्मि- थ्, एवं गिवन् वगैरे विद्वानांत याची प्रासीद्ध झाली.
 नंतर लॉर्ड किंवा त्या वेळचा मुख्य प्रधान याच्या योगानें तो राजकीय कामांत शिरला. तेव्हांपासून याच्या वक्तृत्वामुळें याची कीर्ति पसरत चालली. प्रथम यानें 'अमेरिकेतील छापील कागदांबद्दल कायदा' या संबंधानें पार्लमेंत समेंत भाषण केलें. या वेळेस इंग्लंदांत उत्तम वक्ता पित् साहेब असे. त्याची वक्तृ- त्वाविषयीं फार कीर्ति असे. बर्क् साहेब पूर्वी पार्लमेंत सभेत बो लला नव्हता तरी, शेंकडों वेळ पार्लमेंत सभेत भाषण केलेल्या पित् साहेबाची त्याने प्रथमच बरोबरी केली. यामुळे तो मरपर्तत इंग्लंदांतील राजकीय पुरुषांत श्रेष्ठ झाला. इंग्लंदाविषयीं जितकी त्याच्या मनांत दया असे. तितकीच हिंदुस्थानाविषयीं असे. इंग्लि शांच्या दुःखानें जसें त्याचें मन दुःखित होई, तसेंच हिंदूंच्या दुःखाने होई. त्यापेक्षां हिंदुस्थानाची अधिक दया करणारा एकहि साहेब झाला नसेल. तो हिंदुस्थानांत कधीं आला नव्हता; तथापि त्यास हिंदुस्थानच्या इतिहासाची व हिंदुलोकांच्या रीति- भातींची इतकी माहिती होती कीं, आजपर्यंत कोणत्याहि शोधक साहेबास तशी नसेल. तो पार्लमेंत सभेत बोले तेव्हां सर्व हिंदु- स्थान त्यास डोळ्यांपुढे दिसत आहे असें लोकांस वाटे !
 पार्लमेंत समेत चांगली भाषणे पुष्कळ वेळ होतात, परंतु वारन् हेरिंग्स् याच्या चौकशीच्या वेळेस जी ऐकणारांची गर्दी झाली ती फारच मोठी होती. इंग्लंदांतील बहुतेक सरदार, स्त्रि- यांसहित या वेळेस बर्क साहेबाचे भाषण ऐकण्यास आले होते. राणी स्वतः मुलांसहवर्तमान भाषण ऐकण्यास आली होती.असें