पान:गद्यरत्नमाला.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शकुंतलेची गोष्ट.

९९


जशी विष्ठेवर प्रीति असते, त्याप्रमाणे मूर्खानें लोकांची बोलणीं ऐकिलीं ह्मणजे तो वाईट असेल तेवढ्याचेंच ग्रहण करतो; परंतु विद्वान असेल तो, हंस जसा पाण्यापासून दूध काढून घेतो, त्याप्रमाणे कोणी कांहीं बोललें तरी चांगलें असेल तेवढेच घेतो. साधूला दुसन्याच्या निंदेपासून सुख होतें, परंतु दुर्जनास तिज- पासून आनंद होतो. थोराला नमस्कार केला ह्मणजे सज्जनास समाधान वाटतें, परंतु त्यास शिव्या देण्यांत दुष्टाला मौज वाटते. दुर्जनानें सज्जनास दुर्जन ह्मणजे यापेक्षां जगांत दुसरें अधिक आश्चर्य काय आहे ? असत्य भाषण करणारा मनुष्य हा केवळ सर्पच होय. नास्तिकास देखील त्याचें भय वाटतें, मग धार्मि- कास कां वाटणार नाहीं ? आपल्या पुत्राचा जो त्याग करितो त्याची सर्व लक्ष्मी जाते, त्यास स्वर्गप्राप्ति होत नाहीं; पुत्र सर्व कुलाचा उद्धार करतो, याकरतां राजा, पुत्राचा त्याग करणें हैं तुला योग्य नाहीं. हजारों आड व विहिरी बांधणे, हजारों यज्ञ करणें, या सर्वोपेक्षां सत्याचें पुण्य फार आहे. सत्यापेक्षां मोठा धर्म नाहीं, सत्यापेक्षां श्रेष्ठ व्रत नाहीं, मजपाशीं केलेला करार तडीस न्यावा, नाहींतर खोटे बोलण्याचें पाप लागेल. तुझी इ. च्छा नसेल तर मी जातें. त्वां दिलें नाहीं तरी माझ्या मुलास सर्व पृथ्वीचें राज्य मिळेल. असें बोलून शकुंतला जावयास नि- घाली. इतक्यांत आकाशवाणी झाली ! 'दुष्यंतराजा, शकुंतलेचा अपमान करूं नको. पुत्राचें पालन कर. आई केवळ भ्रात्यासा- रखी आहे. पुत्राचें पालन बापानेच केलें पाहिजे. तुजपासूनच याची उत्पत्ति आहे. ' याप्रमाणे देवांचें भाषण ऐकून गुरु, प्र. धान, वगैरे सर्व सत होते त्यांस राजानें सांगितलें कीं, मला हे सर्व माहीत होते; परंतु लोकांस संशय येईल ह्मणून एकां- एकीं मी हिचें ग्रहण केलें नाहीं. नंतर राजाने मोठ्या आनंदानें पुत्रास आलिंगिलें. आणि देवांनीं ' भरस्व ( पालन कर ) असें ह्यटलें ह्मणून भरत असे नांव ठोवलें. राजानें शकुंतलेचेंहि