पान:गद्यरत्नमाला.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
गद्यरत्नमाला.


घृताची या सर्व अप्सरांत श्रेष्ठ; त्यांपैकीं मेनकेच्या ठायीं विश्वा- मित्रापासून मी उत्पन्न झाले. मला तिनेंहि टाकिलें, भावानंदांनी सोडिलें, आतां तूंहि माझा त्याग करणार, तेव्हां जन्मांतर पाप समजलें पाहिजे. बरें त्वां त्याग केला तर मी परत जाईन, परंतु एवढा आपला पुत्र तरी संभाळ.
 दुष्यंत- मला तुजशीं गांधर्वविवाह केलेला आठवत नाहीं. बायका ह्मणजे बहुशः खोटसाळ, तेव्हां तुझ्या बोलण्यावर भर. वसा कसा ठेवावा ? मेनका निर्दय, लबाड बायको: जिने पोट- च्या पोरास निर्माल्याप्रमाणे टाकून दिलें.तुझा बाप तर तपस्त्री असून बायकांस भुलणारा. वा ! मेनका अप्सरेमध्ये श्रेष्ठ, तर मग तूं तिची मुलगी असून अशी लवाड बायकोसारखी काय बडबडतेस ? माझ्यासमोर असें बोलण्यास तुला लाज वाटत नाहीं ? चल, जा येथून निघून. विश्वामित्र केवढा ! मेनका को- णीकडे ! आणि तूं भिकारीण त्यांची मुलगी कशी शोभशील ? हा एवढा थोरला तुझा मुलगा थोड्या वेळांत कसा वाढेल ? तुझी जातच वाईट आहे. तूं लबाड बायकोप्रमाणें बडबडतेस, तूं काय ह्मणतेस यांतले मला कांहींएक माहीत नाहीं, तुला पाहिजे तिकडे जा.
 शकुंतला - राजा, दुसऱ्याचा तिळाइतका उणेपणा काढ- तोस; परंतु आपला नारळाएवढा असून देखील तुला दिसत नाहीं. मेनकेची स्वर्गी देवांतसुद्धां प्रतिष्ठा आहे. तुझ्यापेक्षां मा- झेंच जन्म श्रेष्ठ आहे. दृष्टांताकरतां खरें आहे तें बोलतें, त्याचा आपणास राग नसावा. कुरूप मनुष्य आरशांत आपले तोंड पाहत नाहीं, तोंपर्यंत मी मोठा रूपवान असे त्यास वाटतें. परंतु एकदां आरसा पाहिला हाणजे लोकांत व आपल्यांत अंतर काय, त्यास समजते. वस्तुतः खरा चांगला आहे तो कोणाचा अ- पमान करीत नाहीं. स्वतः वाईट असतो तो मात्र बडबड क- रून लोकांची निंदा करतो. चांगले पदार्थ असले तरी डुकराची