पान:गणेश चतुर्थी.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारागीर मिळवितो. गणपती घरीं आणिल्यावर त्या- च्यावर टीका होऊ लागतात. कोणी ह्मणतो. ह्या ग- णपतीचें ध्यान चांगले साधले. कोणी ह्मणतो, आ. सनाचा आव फार चांगला झाला, पण अंमळ सोड बिनसली. अणखी एकजण ह्मणतो, ह्या गणोबाचें पोट तर खपाट्यास गेलें. दुसऱ्या गणपतीला पाहून ह्मणतो याचे दोंद भले मोठे झालें. आतां याच्या य- जमानास काय कमी आहे ? याप्रमाणे त्या बापड्या देवावर टीका चालतात, व त्या तो मुकाट्याने ऐकत बसतो. त्याच्या पूजेस आरंभ होण्यापूर्वी त्याला बराच वेळ एकीकडे बनावें लागते, कारण यजमान व घर- चीं माणसें त्याच्यासाठी आरास करण्यांत गुंतलेली असतात. पूजेच्या आरंभी प्राणप्रतिष्ठा होते, ह्मणजे ब्राम्हण मंत्राच्या योगानें त्याजमध्ये देवत्व आणितात, पण तें आल्याचे लक्षण कांहींच दिसत नाहीं. पूजे- च्या आरंभी इतर देवांस जसे स्नान घालतात तसे यास घालीत नाहींत, कारण जलस्नानाने गणोबाची सर्व कळा जाईल अशी भक्तांस भीति असते. गण- पतीच्या पूजेत विशेष हें आहे की त्याला २१ मो-- दकांचा नैवेद्य लागतो. त्याला लाडवांची मोठी आ-