पान:गच्चीवरील गप्पा.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाटपांच्या दाव्यांकरतां स्वतंत्र कोर्दै पाहिजेत !

रच्या खरड्यावर कुटुंबांतील माणसांच्या सह्या घेतल्या तर कोर्टात उद्भ वणारा घोटाळा पुष्कळच कमी होईल. तसेंच वर्षारंभी जमाखर्चाचें अंदा- जपत्रक करून त्यावर संमतिदर्शक सर्व भावांनी सह्या केल्या तर कर्त्यानें ” कुटुंबाच्या फायद्याकरतां खर्च केला नाहीं ह्या तक्रारीना तोंड राहणार नाहीं. स्वतःचा खर्च वाटेल तितका कोणी केला तरी त्या- च्याच खात्यांत तो पडला म्हणजे इतरांस कुरकुरण्यास जागा राहात नाहीं. अशा रीतीनें एकत्र राहण्याने मिळणारे फायदे हातचे घालवणें योग्य नव्हे. सरकारप्रमाणे घरच्या कारभारांतहि जर निरनिराळीं कामें निरनिराळ्या माणसांवर सोंपवायचीं तर सरकार जसे आपल्या अधिका- यांना पगार देतें तसें एकत्र कुटुंबीयांनी तरी कां करूं नये ? म्हणजे घरचें कामहि घरच्या माणसांकडून शक्य तेथें फुकट घेऊं नये. स्त्रिया स्वयंपाक करतात त्याचा मोबदला त्यांस का मिळू नये ? ह्यामुळे प्रत्ये- काला स्वतंत्र द्रव्यसंचय करतां येतो. पारतंत्र्यांतहि स्वातंत्र्य मिळतें; आणि काम अधिक उत्सुकतेनें केलें जातें. सारांश समाइक कुटुंबांतली मंडळी केवळ पंक्तिबारगीर बनणार नाहींत अशा प्रकारच्या योजना अम- लांत आणण्याचा प्रयत्न कोणी कसून केल्यास अंतीं त्याचा निरुत्साह. होईल असें वाटत नाहीं. पण हें सर्व करण्यास अक्कल पाहिजे; सद्बुद्धि पाहिजे; तशीच हौस पाहिजे. परंतु ह्यांची पैदास कशी होणार ? घोडें पेंड- खातें तें येथेंच.