पान:गच्चीवरील गप्पा.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाटपांच्या दाव्यांकरतां स्वतंत्र कोर्टें पाहिजेत.

निकालाने फारसें पुण्य मिळत नसल्याकारणानें व वाटपाच्या दाव्यां- तील बजावणीचें काम नेहमींच भानगडीचें असल्यामुळे मानवी वृत्तीचा न्यायाधीश अशा कामांसंबंधानें वेफिकिर असतो ह्यांत चमत्कार तो कसला ? म्हणूनच ह्या कामाकरतां स्वतंत्र व फिरती कोर्टें स्थापणें अवश्य आहे. वाटपाच्या कामी धारवाडी कांटा धरणे कधींहि शक्य नसतें. वाट- पांत कमजास्तपणा टाळणे दुर्घट आहे. पण कोर्टात गेल्यानें कोर्ट आप- णांस रसातळास नेतात हैं सर्वांनी लक्ष्यांत ठेवावें. वाटपाच्या दाव्यांसंव- धानें वरील विधानांत यत्किंचितहि अतिशयोक्ति नाहीं. बाप मेल्यानंतर भावाभावांत परस्परांविषयीं अविश्वास उत्पन्न होतो आणि एकदां कां कोर्टात भांडण गेलें म्हणजे ज्याच्या हातीं जें लागेल तें त्यानें लांबवावें असा प्रकार हमेशा घडत असतो. आतां ह्या गोष्टीस नाइलाज आहे असें मात्र नाहीं. बापाने मुलांचे हिस्से पृथक केले नाहींत तरी आपल्या सर्व स्थावरजंगम मिळकतीची यादी करून ठेवण्यास अडचण कसली ? अशा प्रकारच्या याद्या किती कुटुंबांस सांपडतील ? जगाचा इतिहास घोकावा आणि स्वतःच्या कुटुंबाचा इतिहास अनवगत असावा ही शहा- णपणाची रीत नाहीं. हातचें कांकण आरशांत पाहण्याचा प्रसंग आला म्हणजे वेवकूबपणाची कमाल झाली असेंच म्हटले पाहिजे.
 सहकारी तत्त्वानुसार आमच्या कुटुंबांचा कारभार चालविला तर सर्व कुटुंबांना लौकिक, सुख आणि सुस्थिति लाधल्याशिवाय राहणार नाहीं. सध्यां आम्ही कुटुंब चालवतों हें म्हणणेंच खरें नाहीं. कुटुंब कसे तरी चालतें; मग परिणामीं कसें तरी झालें तर दुःख कां मानावें ? कुटुंब म्हणजे छोटेसें राज्य होय. मग राज्यांत जशीं निरनिराळीं खातीं अस- तात व त्यांवर निरनिराळे अधिकारी असतात तसे कुटुंबांतहि कां नसा- वेत ? एका माणसाचें लक्ष्य चोहोंकडे रहात नाहीं. घरांतील कामें बायका- पुरुषांत व यथाशक्ति मुलांत हि वांटून घेण्याची आमच्यांत रीत दिसून

७५