पान:गच्चीवरील गप्पा.pdf/५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
उद्घाटन.

बोलूनचालून गप्पाचे त्या. गप्पा म्हटल्या म्हणजे त्या जशा साधार असूं शकतात तशा अनाधारहि नसतात असे नाही. तथापि विन- बुडाच्या गप्पांनी उद्बोधन तर साहिलेच पण मनोरंजनहि होईल की नाहीं ह्याची वानवाच आहे. प्रस्तुत छोटेखानी पुस्तकांतील गप्पा ह्या कोणत्या सदरांत घालावयाच्या ह्याचा ज्यानें त्यानें आपल्या अनुभवाशी मेळ घालून ठरविलें पाहिजे. अनुभव हा सत्याचा जनक आहे, पण सध्यांच्या काळांत अनुभवाची धडगत दिसत नाहीं. सर्वं जग शब्दांच्या तरांड्यांत बसून हेलकावे खात आहे. शब्दावरचा पापुद्रा फोडून आंतल्याची छाननी करण्यास कोणास फुरसत नाहीं. शिक्षणप्रसाराने प्रत्येकाला विचार करतां यावा ही उत्कंठा; पण ती तृप्त कशी व्हावी ? स्वयंविचारास सवड पाहिजे; पण ती कोठून आणावयाची ? सगळ्या गोष्टी करतां येतात; पण प्रत्ये- काच्या पोटाची सोय कोणाला करतां येत नाहीं. उलट हल्लींच्या संस्कृतीनें असें झालें आहे कीं ज्याला पोटाची विवंचना नाहीं असा प्राणी विरळा. त्यामुळे विचाराच्या, विवेकाच्या बाबतींत सर्वत्र सामान्यजनांत परोप- जीवित्व दृग्गोचर होतें. आचारांप्रमाणे विचारांनाहि शिष्टत्व प्राप्त होतें. निरनिराळ्या काळीं निरनिराळे विचार, मतें, शिष्टत्व पावतात. शिष्टांचे विचार झिटकारून स्वयंविचार प्रस्थापित करूं लागल्यास अशिष्टांत गणला जाण्याची प्रत्येकास भीति वाटते. अशा रीतीने वारंवार शिष्टांच्या अपक्क विचारांचें लोण समाजाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नेलें जातें. हल्लींच्या काळांत स्त्री स्वतंत्रपणे वागण्यास पात्र आहे असा डांगोरा पिटलाच पाहिजे, प्रजासत्ताक राज्यपद्धतिच इरसाल ह्या म्हणण्याला नाक मुरडतां कामा नये. बहुसंख्याकांच्या ऐवजी अल्पसंख्याकांच्याच हक्कांची बडेजाव ठेवली पाहिजे; कर्मासक्त अज़ जनांचा बुद्धिभेद करणे हितावह आहे असे मत प्रदर्शित केलेच पाहिजे. रूढीच्या गुलामगिरीचा नाय - नाट केलाच पाहिजे, मग स्वातंत्र्य फैलावून नवीन त-हेची गुलामगिरी