पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. त्यात आयातनिर्यातीवर बंधने नसतील. भांडवल खुले खेळेल आणि खऱ्याखुऱ्या बुद्धिमंतांच्या बुद्धिसंपदेवर डाका घालण्याची संधीही कुणाला मिळणार नाही.
आता ठगगिरी चालणार नाही
 नव्या भगव्या 'स्वदेशी'चे पुरस्कर्ते खुल्या व्यापारावर बंधने आणू पाहातात; पण, बौद्धिक संपदेच्या चोरी-तस्करीवर मात्र कोणताही अडथळा येता कामा नये असे गुरकावून सांगतात. १९६८ साली सर्व यूरोपात अमेरिकन तंत्रज्ञानाचे रंगीत दूरदर्शनसंच येत होते. अशाही वेळी फ्रान्समध्ये रंगीत टीव्ही आला तर तो फ्रेंच तंत्रज्ञानानेच येईल असा आग्रह फ्रेंच राष्ट-ध्यक्ष जनरल द गॉल यांनी धरला. या आग्रहामागे एक स्वदेशप्रेम आणि स्वदेशनिष्ठा होती. भगव्या स्वदेशीमागे आणि डंकेल प्रस्तावाच्या विरोधकांमध्ये स्वदेशप्रेम नाही, स्वदेशियांच्या व्यापक आर्थिक हितसंबंधांची चिंताही नाही; त्यांचे उद्दिष्ट आहे, इंडियातील काळ्या इंग्रजांच्या ठगगिरीचे समर्थन.

(२१ ऑगस्ट १९९२)

४८
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने