Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुदत जरी संपली. तरी वरील योजनेस्तत्र ती आण- खी मे० ता० ३१।१८९२ पावेतों वाढविली आहे. वाढविली ह्मणून स्वस्थ बसूं नकाहो !! नवीन आ- श्रयदात्यांकरितांच ही मुदत वाढविली आहे बरें ! जर खचितच जोडीदार मिळवून देण्याची सवड असेल तरच मुदतीची (ता० ३१ मे ) रहा पहा. वर्गणी फार थोडी आहे व खर्च कसा येत आहे है प्रथमां- कांतील “प्रस्तावना” वाचून पाहिल्यावरून सर्वांस श्रुत झाले आहे.
 ४ ज्या सद्गृहस्थांनी १ ला अंक परत किंवा वर्गणी पाठविली नाहीं, त्यास दुसरा अंक व्ही० पी० नं पाठवावयाचा; परंतु वरील मुदतीपावेतों आणखी सवड दिली आहे तरी आतां आळस व विलंब न करितां वर्गणी पाठविण्याची तजवीज अवश्य करा- वो, नाहींपेक्षां तिसरा अंक व्ही० पी० नें ( १४५ ) पाठविणें भाग येईल. दुसरा अंक पाठविला आहेच वर्गणीदारांनी जर वर्गणी वेळेवर देण्याचें केलें तर अंकही आह्मीं वेळेवर निश्रयाने काढणार आहोत. छापखान्यांत अगाऊ पैसा भरलाच पाहिजे असा क्रम असल्यामुळे पैशाची फार जरूरी असते, आणि असे झाले नाहीं ह्मणजे मजप्रमाणे स्वतःचा प्रेस नसले- ल्यास निरुपायाने अंक बंद करणें भाग येते. वगैरे सर्व गोष्टींचा विचार पाहून वर्गणी पाठविण्याची सर्व आ श्रयदात्यांनी कृपा करावी. एक रुपया ह्मणजे जड आहे काय ? !!

म्या० वा०मि० कर्ते.