Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
माधवनिधन काव्य.

मग सुर, सुरयुवति कां ?
रमतात वीच हा तो ? ॥ १९ ॥
गुरुपत्ना शैशिरमला;
शेचि भोगी गौतमाची ती भार्या ॥
स्वसुता उपभोगीन हो,
उक्त कसा ब्रह्मदेव ह्या कार्या ॥ १६ ॥
होह असो ह्मणती परि,
विश्वाची जीस जननि ती गौरी ॥
पाहुनि हिम शिखरीं तो,
तप्तकैंसा ब्रह्मदेव कामज्वरीं ॥ १७ ॥


 १ देव. २ देवांच्या स्त्रिया ३ अयोग्यपणाचें वर्तन. ४ चंद्र. ५ इंद्र. ६ अहल्या ७ काम ( ब्रह्मदेव स्वसुताजी सरस्वती हिज- प्रत कामानी योजिता झाला होता. ) ८ जगाची. ९ हिमाल- यावर. १० पीडित. ११ मदन व्यथेनें. * (आर्या १७) ब्रह्मो तखंडांत अशी कथा आहे कीं, पार्वती ही पहिल्या जन्मीं दक्षाची कन्या होती व तेव्हां तिचें सती असें नांव होतें. दक्षानें सती हिन ला शिवास दिलें होतें. परंतु शिव दरिद्री व मन मानले तथा रीतीने वागतो असें पाहूनतो त्यास फारसा मानीत नसे. शिवाय एकदां दक्षाची स्वारी कैलासी गेली असतां त्यास शिवानें अभ्युत्थान वगैरे देऊन मान सन्मान केला नव्हतां ह्मणून तो तेव्हांपासून त्या उभय कन्या, जामातास पाण्यांत पाहूं लागला होता. पुढे एके वेळी दक्षगृहीं यज्ञ होता ह्मणून त्याने शिवपार्वती ( सती व शंकर) ह्या शिवाय करून सर्व सुरवरांदिकांस पाचारण केलें होतें, शिवास दक्षानें आपण पाचारण नाहीं केलें तर नाहीं. ह्मणून फार से कांहीं वाईट वाटले नाहीं परंतु सतीस तें न आवडून पितृ गहींचें पाचारण नसतांही व शिवमन प्रसन्न नव्हतें तरी ती स्वह. हार्ने दक्षाच्या यज्ञमंडपांत गेली होती. आणि तेथे दक्षाने आपले पाचारण नसतां कन्या आली हें पाहून व मागील द्वेषभावामुळें