Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुबोधकथामाला.

स आपल्या बाललीलेकरून (चमत्कृति आचरणाच्या द्वारे) संतुष्ट करून सोडण्याची कमाल केली होती !! ती ज्या वेळी आपल्या समंजसपणांत आली त्यावेळीं ती नित्यशहा स्वगृहशोभा करणें; देवगृहीं नाना प . त्रादिकांचीं तोरणे लावणें, गुडिया उभारणें, कुशलतेचे भावदर्शक चित्रविचित्र रंगवल्लिका आंखणें, स्वस्तिकें, शंख, चक्र, गदा, पद्मादिक आयुर्वे सादृश्यते परिरे- स्वर्णे, विकसित सुपुष्पांच्या माळा, गजरे, तुरे करून देव ब्राह्मणास अर्पण करणे, स्वतः नानापरिमल द्र- व्याच्या सिद्धतेनें देवतार्चन करून दृढ मानस भक्तींत. रंगली जाणें, इत्यादी सत्कृत्यांत सदैव गुंतलेली असे ! सारांश तो बाल्यदशेतच सदाचरणप्रवृत्त अशी बनली होती, व त्या वरून ती मुकुलजा ह्या नाम- ष्टत्वास योग्य अशी होऊन त्या काळचे सर्व लोक ते तिचे सगुण पाहून फार थक्क होत !! मग ज्यांच्या पोटीं तिर्चे जन्म झालें होतें त्या मातापितरांस किती आश्चर्य व समाधान वाटले असेल हें येथें निराळे सां- गर्णे नको !!!
 या संसारांत मनुष्यमात्रांस खरें सुख प्राप्त होण्या- स द्रव्य हैं एक मोठें साधन आहे; परंतु ते प्राप्त अ- सतां ही घरांत जर पतिव्रता मनोविहारणी स्त्री, कुलावतंसपुत्र अथवा कन्या हीं नसली तर त्या द्र- व्यापासून व्हावे तसें सुख मिळत नाहीं ! राज्यपद कां प्राप्त होईना पण ह्या दोन गोष्टीची उणीव असतां त्या वैभवापासून कांहींच सुख व्हावयाचें नाहीं. ! !. सारांश श्रीमंती नसली तरी चालेल, पण घरांत सुगृ-