Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुबोधकथामाला.

वाससंबंधी कष्ट सोसण्यास असह्य असे बनलों आहों- !! करितां हे मक्तजनकामकल्पद्रुमईशावतार धारक श्रीकृष्णा आम्हांवर तूं दया करून ह्या संक. टांतून मुक्त होऊं अशी कांहीं तोड दाखवीच ! त्यावर तुझी संकट नाशनार्थ कांहीं व्रतादिक करण्यास तत्पर असाल तर मी एक अल्पसा असाच तुह्मास उपाय सांगेन म्हणून श्रीकृष्णानें प्रश्न केला, तेव्हां पांडव पूर्वीपेक्षाही फार काकुळतीस येऊन त्यास विनविते झाले की, हे देवा, तुझी आज्ञाच आम्हास मान्य आहे; ह्मणून जेंजें सांगणें असेल तेंतें खुशाल सांग. असें मोया आनंदाने व लीनतापूर्वक म्हणाले व त्यावेळी श्रीकृष्णांनी त्यांस जो अनंत देवाचा महिमा सांगितला आहे तो मी येथें गद्यरूपानें सादर करितों:-
 श्रीकृष्ण ह्मणतात- पूर्वी कृतयुगांत वसिष्ठ गो- त्रोत्पन्न सुमंतु नामा एक विप्र होता. भृगुची दीक्षा नामें जी एक कन्या होती तो त्याची धर्मपत्नी असे. ही पतिव्रता आणि उदार बुद्धि अशी होती, यास्तव तिजसंगतीनें त्या सुमंतु विप्राचा काळ मोठ्या आनंदांत जात असे आणि पुढें त्यास योग्यकाळीं जी एक क- न्या झाली होती, ती फार रूपवती व गुणवती अशी असून तिर्ने त्या उदार बुद्धीच्या उभय मातापितरांस आपल्या मुखचंद्रदर्शनाने आणि अंगभूत सहजलीले- करून आनंदित करून सोडल्यामुळे तिचे त्यांनीं अ- त्यंत आवडीचे व योग्य सुशीला असे नांव ठेविलें होतें. तो दिवस, मास, ऋतु, अयन, वर्षांच्या अनुरोधानें चंद्रकलेव वाढत असतां तर तिनें आपल्या आईबापां-