Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रति विक्रमचरित्र.

वासाची शिक्षा मिळे ! " त्या मुळे त्याच्या वर्तन- कमाबद्दल कोणी एक ब्र ही काढीत नसत. इत- क्यावरून त्याचे वर्तनांत कांहीं वाईट प्रकार होते असें मात्र कोणी मनांत आणूं नये; कारण ही कथा जरी दंतप्राधान्य आहे तरी विक्रम हा कोणत्या प्रकारचा मनुष्य होता है सर्वत्र महशूर आहेच ! अस्तु-
 लीलावती असे धाडसाचें कृत्य पाहून त्यास वाईट तर वाटलेच परंतु सेवकाच्या वचनावरच केवळ भरंवसा ठेवणे हें योग्य नाहीं तर ' चक्षुवैसत्यं ' डोळ्यानी पाहिलेली किंवा कानानी ऐकलेली गोष्ट तीच खरी मानावी या करितां आज रात्रौ स्वतः ह्याचा परिचय पाहून नंतर जें करणें तें करावें. असा त्यानें निश्चय केला व तद्वत् त्याची त्यानीं अम्मलबजाव- णीही केली. त्या रात्री भोजनोत्तर तो स्वतः गस्तीचा पोषाख चढवून त्या दूताबरोबर शहरांत फिरावयास निघाला आणि थोडक्याच वेळांत सावकाराच्या वाड्या- नजिक येऊन पोंचून एका अडोशास गुप्त रीतीनें छपून बसला व पुढे त्या बाप मुलीचा कांहीं वेळानें भाषण सुरू होऊन त्यांत हेराच्या बातमीचा तथ्यांशही त्यास दिसू लागला; यास्तव तो त्यांचा संवाद अगर्दी लक्ष लावून ऐकूं लागला. त्यांतील सारांश असा मु०-( आश्चर्यभावदर्शक मुद्रा करून ) बाबा तुह्मी क्षत्रिय कुळांत जनन पावला असून परम- शूर आणि सत्यभाषणप्रिय असे आहांत व हा आपला सत्यभाषणप्रिय स्वभाव आपण चंपावतीस व असतां घरांतील थोर लहानांस न आवडला हा-