Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रति विक्रमचरित्र.

शोध काढी आणि घरी असे त्या वेळीं दर मासांती कृष्ण पक्षांतील शैवटले पांच दिवस रात्रीच्या ठाईं स्वतः गस्तीचा पोषाख चढवून शहरांत फिरावयास जात असे अशी कांहीं त्याची कारकीर्द चमत्कारिक तऱ्हेची पण न्यायास अनुसरून होती; अस्तु.
 वाचकहो ! वर लिहिल्या प्रमाणें तो विक्रमसेन सन्याय वर्तनानें आपला काळ घालवीत असतां एके- दिवशी त्यास एका विश्वासु गुप्त हेरानें येऊन सांगि- तलें कीं महाराज आज बहुत दिवस झाले मी या अवंतीत रात्रीच्या ठायीं गस्त घालीत फिरत असत. त्यावरून आपल्या नगरांतील प्रत्येक लहान थोर मनुष्य आपल्या सुखावह राज्यपद्धतीची व आप- ल्या अंगीं वसत असलेल्या नाना गुणाविषयींची प्रसन्नांतःकरणानें स्तुति करीत असतात ह्मणून आणि त्या स्तुतीस आपण पात्रही आहांत अशी माझी खात्री आहे असें असतां आज एक महिना झाला असेल आपल्या शहरीं कोणी चंपावती नगरचा एक श्रीमान् व्यापारी येथे रहावयास आला आहे. त्याची लीलावति नांवाची एक अत्यंत सुंदर व तरुण कन्या आहे ती मात्र मी ज्या ज्या वेळीं तेथें जाऊन ऐकतो त्या त्या वेळी आपली निंदा करीत असल्याचे माझ्या प्रत्ययास येत असते; त्या मुलीचा बाप तिला पुष्कळ प्रकारें समजुतीच्या गोष्टी सांगतो; पण ती आपला आग्रह सोडीत नाहींच असे त्या हेरार्चे भाषण ऐकून राजास परमाश्चर्य वाटलें. "कारण. त्या काळी त्याची निंदा करील त्यास जन्मभर कारागृह-