पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशा दिग्गजांबरोबर कार्य करताना आपले ‘अर्थ’ विषयक कौशल्य कमी नाही हे त्यांनी दाखवून दिले. प्रिन्सिपल शं. गो. दाभोळकरांना ते आपले सामाजिक गुरु मानतात.
 आपल्या गुरुबद्दल त्यांच्या मनात निस्सीम असा आदर. तो आदर शब्दापेक्षा कार्याने जपणे, जोपासणे त्यांना आवडते.

 के. डी. कामत हे माझ्या व्यक्तिगत आयुष्यात नेहमीच मार्गदर्शक व हितचिंतक म्हणून ‘आधारवड' वाटत आलेत. माझ्या कामाकडे त्यांचे तटस्थ लक्ष असते. त्यातील वेदनांची जाणीव त्यांना असते. अशी जाणीव यणे यासाठी लागते सहृदयता. ती त्यांच्यामध्ये आहे. वयापेक्षा मी त्यांना किती तरी लहान. पण मला ते नेहमी आदराने, आत्मीयतेने वागवतात. माझ्याशी बाले तात. मोठे प्रेम असते त्यात. माझ्यामागे नेहमीच ते कृष्णार्जुना प्रमाणे सुदर्शन घेऊन उभे असतात. मग कधी शरसंधान तर कधी पटवधर्नअसा विवेकी पवित्रा घेणारे कामतसाहेब वृत्तपत्रात येणा-या माझ्या प्रत्येक शब्दांचे चिकित्सक वाचक असतात. वाचलं की फोन ठरलेला. ही उदारता तेच दाखवू शकतात. कारण मनामागे त्यांच्या 'कृष्ण' नि ‘कपट' पटलं कधीच नसतात. एकदा वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या माझ्या एका लिखाणावर जाहीर प्रशंसा करणारा लेख लिहिणारे कामतसाहबे मला आप-पर भेद पलीकडे गेलेले सतं मनाचे समाज सेवकच वाटतात. Man is known by the company he keps असं म्हटलं जातं. त्यातील उभयांगांनी येणारा अर्थ सार्थ करणारे कामतसाहेब हे खरे मनुष्यपारखी समाजसेवक व माणुसकीची पखरण करणारे प्रति वारकरी. त्यांच्या वारकरी व्यक्तिमत्त्वात 'वार' करण्यातील भक्ती पण असते व प्रसंगी 'वार' करण्याची आक्रमकताही. त्यांचं सारं व्यक्तिमत्त्व जैसे को तैसा' अशा अलिखित कराराने विकसित झालंय. त्यांच्या फणसातील ज्यांना ‘गरे' मिळतील ती माणसं असतात. कवचावरील ज्यांना ‘काटे' बोचले असतील त्यांनी अंतर्मुख व्हावं. कामतसाहेबांच्या समग्र जीवनाची मला समजलेली ही ‘लिटमस टेस्ट' होय.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/९८