पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मितभाषी समाजसेवी : प्रा. डी. एम. चव्हाण

 जिल्हा परिवीक्षा व अनुसंरक्षण संघटना मानद चिटणीस पदावर गेली पंचवीस वर्षे व्रतस्त वृत्तीने कार्य केलेले प्रा. डी. एम. तथा दादासाहबे चव्हाण प्राकृतिक अस्वास्थ्यामुळे या पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले. कोल्हापूरच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सर्वांच्या परिचयाचे ‘दादा' निःस्पहूपणे व प्रसिद्धी विन्मखुतेने कार्य करणारे समाजसेवक म्हणून सर्वश्रुत आहेत. शहरातील अनेक बँका, सोसायट्या, ट्रस्ट, क्लब, शिक्षण संस्थांचे ते संस्थापक शिल्पकार आहेत. समाजातील इतक्या विविध क्षेत्रात आपल्या कार्याची अमीट छाप सोडणारे दादा हे सर्व मौन व शातंपणे, स्थितप्रज्ञतने करत आले हे विशेष पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी विन्मुखतेने कार्य करणारे समाजसेवक म्हणून सर्वश्रुत आहेत. पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी इत्यादीच्या मोहजालात गुंतण्याचा त्यांचा स्वभाव नाही. काम करायचे पण ते कळू द्यायचे नाही, हा त्यांच्या स्वभावधर्मस्वतःबद्दल, स्वतःच्या कामाबद्दल दादा कधी बोलल्याचे ऐकिवात नाही, असा या मौन समाजसेवकांच्या जीवन व कार्याचा परिचय सर्वांना व्हावा म्हणून हा लेख प्रपंच.

 दादाचे पूर्ण नाव दिगंबर मसाजी चव्हाण. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर, १९११ रोजी झाला. आईचे नाव विठाबाई. वडिल मसाजी हे तत्कालीन संस्थानी सवे ते अर्थ विभागाचे लिपिक होते. त्यांची आई किसरूळ (भोगाव)ची. दादा वयाच्या आठ-दहाव्या वर्षी आपल्या मावशीस दत्तक गेले. दादांना एक भाऊ व बहीण होती. दादांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या बाबूजमाल मशिदीजवळ भरणाच्या शिवचैतन्य विद्यालयात झाले.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/९९