पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/142

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


त्यांच्या मनाची ठेवणच अशी होती की प्राध्यापक समाजाविरोधी जो तो आपला प्रतिस्पर्धीच. (शत्रू नव्हे!) त्यास गारद केल्याशिवाय माघार नाही. हे सारं करताना त्यांनी मूल्यनिष्ठा, साधनशुचिता, विवेक, सत्यप्रियता कधी ढळू दिली नाही. मागच्या दाराने, बंद दरवाजे करून त्यांनी कधी काही संघटनेसाठी वा स्वतःसाठी मिळवलं नाही. मीच नाही तर माझे सारे सहकारी माझ्यासारखे सच्चे हवेत असा त्यांचा आग्रह असायचा. त्यासाठी पत्रे, निवेदने, चर्चा, बैठका झडत. त्यांच्या लोकशाहीला एकदिशा होकायंत्र होतं. ते म्हणजे प्राध्यापक हित.
 संघटना शक्तीवर विद्यापीठावर निरंकुश राज्य करण्याचा करिश्मा हा प्रा. संभाजीराव जाधव यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाचं फलित! कुलगुरु निवडण्यापासून ते डी. लिट. डिग्री प्रदान करण्यापर्यंत सर्व अभ्यासमंडळे, अधिष्ठाते, विद्वत सभा, सिनेट, व्यवस्थापन परिषद सर्वांवर एकाधिकार मिळवून प्रा. संभाजीराव जाधव यांनी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात एक कीर्तिमान निर्माण केला होता! संघटनेशिवाय ते जगूच शकत नव्हते. संभाजीराव व संघटना म्हणजे अद्वैत!
 अलीकडच्या काळात संघटनेत काही मतभेद निर्माण झाले होते. अनेक ज्येष्ठ सहकारी संघटनांविरोधी भूमिका घेतात असं त्यांना वाटायचं! पण एकहाती नेतृत्व करणाऱ्याला मतभिन्नता म्हणजे विरोध वाटत राहतो. अशा काळातही प्रा. संभाजीराव आपल्या मतांवर कसे ठाम असत हे मी त्या काळातील एका कामात जवळनू अनुभवलं आहे. संघटना त्यांनी शेवटपर्यंत एकमुखी ठेवली त्याचं रहस्य संघटनेच्या आर्थिक स्थैर्यास आहे. प्राध्यापक विश्व, प्राध्यापक कल्याण निधी, प्राध्यापक पतसंस्था, कुठंही तुम्हास भ्रष्टाचार आढळणार नाही. उलटपक्षी या संघटनेने अनेक कामगार संघटना, सामाजिक उपक्रमांना साहाय्य केल्याचं तुमच्या लक्षात येईल.

 प्राध्यापक समाजाचं सारं रूप पालटणारा हा किमयागार... त्यानं कधी आदर्श प्राध्यापक पुरस्कार मिळवला नाही. महाविद्यालयात निरोप समारंभ घेतला नाही. एकसष्ठी नाही की गौरव नाही. निवृत्त तरी कार्यप्रवृत्त राहून एका अर्थानी त्यांनी प्राध्यापक समाजास न सांगता एक शिकवणच मागं ठेवली आहे. पोट, घर, मुलं- बाळं यासाठी नोकरी असते. पण ती इमाने इतबारे करत स्वतःच्या पलिकडे जाऊन बरचं करता येतं. समाजासाठी... दुसन्यासाठी! इतरांसाठी करायला घरावर तुळशीपत्र नाही ठेवावं लागत. गरज असते फक्त सामाजिक भानाची! ...दुसऱ्यासाठी करायची कळकळ म्हणजे शिक्षण, प्रा. संभाजीराव जाधव यांनी प्राध्यापक समाज इतका सुरक्षित, समृद्ध केला आहे की आता जर त्यांनी शिक्षण, संशोधन, लेखन,

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१४१