पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/141

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुस-या दिवशी सकाळी रेल्वेने जायचे ते तडक वर्गात जायचे... मग शेक्सपियर, मिल्टन, गटे कोलरिज, यिटस्, शॉ, रसेल सारे त्यांना घाबरत! थरथरत वगार्त उभे!! ही असते व्यासंगी शिक्षकाची खूण.
 जो धाक, अधिकार भाषा, साहित्यावर तोच संस्थाचालक, विद्यापीठ आणि शासनावर! मला आठवतं, एकदा संप झाला होता. शासनाने मागण्या मान्य केल्या होत्या. पण आदेश जारी होत नव्हता. आम्ही मंत्रालयात शिक्षण सचिवांकडे गेलो होतो... ते थातूरमातूर उत्तर देऊ लागले. संभाजीराव तडक म्हणाले...आम्ही नाही तुम्हाला या बोटावरची थुकी त्या बोटावर करायला शिकवली... हे तुमचं उपजत शिक्षण दिसतं...मंत्र्यांना सांगा... २० तारखेच्या आत आदेश नाही निघाला तर आमचे दोनच प्रतिनिधी विधान परिषदेत तुम्हास रोखतील.' आम्ही बी रोडवरील होस्टेलवर उतरलो होतो... सायंकाळी आदेश आमच्या हाती पोच झाला होता.
 प्रा. संभाजीरावांचं लेखन व वक्तृत्व बिनतोड होतं. मला कधी कधी वाटायचं की, लॉ कॉलेजातच यांनी शिकवलं असतं तर सारे वकील अधिक निष्णात झाले असते. त्यांची निवेदने म्हणजे तर्कशुद्ध लेखनाचा वस्तुपाठ! विरोधी पक्षाला बिनताडे नामाहेरम करण्याचे कौशल्य त्यांच्या लेखणीत उतरलं होतं, ते प्राध्यापकांवर झालेल्या अनेक अन्याय, अत्याचारांच्या हृदय पिळवटणाच्या कहाण्यांतून! फार कमी लोकांना हे माहीत असले की, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम असो वा विद्यापीठांचे स्टॅट्यूटस- ते संभाजीरावांच्या एकटाकी प्रारूप लेखनाचीच फलनिष्पत्ती! त्यांनी प्राध्यापक ट्रिब्युनल्समध्ये अनके केसीस लढल्या... त्यांना अपयश नव्हती त्यांच्या कार्यकालात एकही प्राध्यापक घरी बसला नाही. त्यांनी ट्रिब्युनलला कधी संघटनेचा वकील दिला नाही. मुंबई उच्च न्यायालयात ते कै फियती लिहित. सनद नसल्याने वकीलपत्र दुस-याचं असायचं! अॅड. फडणीस साच्या केसीस लढत पण सारी कागदपत्रे, एक्झिबिटस, जी. आर, स्टॅट्यूटस् संभाजीराव पुरवत. पुढे ते वकीलही प्राध्यापक संघटनेचे प्रवक्ते झाल्यासारखेच प्लीड करत.

 एखाद्या संस्थेविरुद्ध शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटनेने (सुटा) ब्र काढलं की त्याचा बभ्रा ठरलेला. भल्यभल्यांनी संघटनेपुढे हात टेकले. त्यांच्या नावाची जंत्री मोठी आहे. कधी कधी (अपवाद म्हणून) प्राध्यापकाची चूक असायची. संभाजीरावांच्या लेखी तो प्राध्यापक निर्दोषच असायचा. ते म्हणत... ‘प्राध्यापकाची चूक ज्या परिस्थितीतून झाली ती परिस्थितीच त्याला जबाबदार असल्याने प्राध्यापक निर्दोषच.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१४०