पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

"See the world from other Side' चा संस्कार देईल. 'स्वत... साठी जगलास तर मेला, दुस-यासाठी जगला तर खरा जगला' अशी शिकवण,प्रेरणा देणारी ही चित्रे, चारित्र्ये एकविसाव्या शतकातील नव्या पिढीस ‘प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा' ची प्रेरणा देतील.
 ‘कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक' असे पुस्तकाचे शीर्षक असले तरी या काळातील सर्व समाजसेवकांचा यात अंतर्भाव नाही. मी ज्यांच्याबरोबर कार्य केले; जे माझ्या कामाच्या ऊर्जा होत्या अशांचाच यात समावेश आहे. अन्यांचा तो अनादर समजू नये.
 हे पुस्तक अक्षर प्रकाशनचे रवींद्र जोशी, अमेय जोशी व आलोक जोशी यांनी काढायचे ठरवून माझे फार दिवसांचे स्वप्न साकारले. त्यांचे मनःपूर्वक आभार!

- डॉ. सुनीलकुमार लवटे