पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/50

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेलावून धरला. यातून लोक नाराज होत होते; पण आपल्यासाठीच सगळं चाललंय, असंही अनेकांना वाटू लागलं होतं. या सगळ्या घुसळणीतून वाईटाबरोबर बरंच काही चांगलं निष्पन्न होत होतं. विशेषतः बालविवाहाला सामोरं जावं लागण्याची भीती असलेल्या मुली आमच्या मागे मोठ्या संख्येनं उभ्या राहू लागल्या. एक चळवळच शिरूर कासार तालुक्यात उभी राहिली. दरम्यान, यूएनएफपीएनं आमचा प्रस्ताव मंजूर केला. पैसे आले. शिरूर कासारमध्ये संस्थेचे ऑफिस झालं. कर्मचारीवर्ग आला. कामाला आता औपचारिक स्वरूप प्राप्त झालं. पण त्यासाठी गावागावात जाऊन केलेलं अनौपचारिक काम, घुसळण, लोकांचे राग-लोभ, सल्ले, मदत, लोकांमध्ये राहून मिळालेलं जमिनीवरचं ज्ञान... ही संपूर्ण प्रक्रिया आज अधिक महत्त्वाची वाटते. जास्त आठवते. लख्ख प्रकाशात आल्यावर अंधारातलं चाचपडणं आठवतं ना, तशीच!

कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf
४६