पान:केसरीवरील खटला.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केसरीवरील खटला
हायकोर्टाची बेअदबी केल्याचा आरोप
५२०० रु. दंडाची शिक्षा !

तारीख ६ मे १९२४ च्या केसरीच्या अंकांत दोन स्फुट सूचना प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांतील विषय असा होता-पुण्याजवळ लोहगांव येथें कांहीं सोल्जर लोक शिकारीला गेले असतां त्यांपैकी प्रायव्हेट वॉकरच्या बंदुकीची गोळी लागून अर्जुना नांवाचा एक मनुष्य ठार झाला. त्या कामी पुण्याचे जिल्हा मॅजिस्ट्रेट माँटीथ व सेशन जज्ज मि० वाइल्ड यांच्या मतें आरोपी- वर निदान अविचाराचा व निष्काळजीपणाचा गुन्हा शाबीत होत असतां ज्यूरीने त्यावर कोणताहि गुन्हा शाबीत होत नाहीं, असा निकाल दिला. सेशन जज्ज यांना तो निकाल न पटून त्यांनीं तो मुकदमा अखेरच्या इन- साफाकरितां हायकोर्टाकडे पाठविला. मुख्य न्यायमूर्ति सर नॉर्मन मॅक्लाऊड व न्यायमूर्ति फॉसेट यांजपुढें तो ता. ३० एप्रिल रोजीं निघून त्यांनी ज्यूरीचेंच म्हणणें ग्राह्य घरलें व आरोपी वॉकर यास सर्वस्वी निर्दोषी ठरवून सोडून दिले. या विषयावर केसरीला योग्य वाटली ती टका कर- ण्यांत आली होती. परंतु सरकारच्या दृष्टीने ती टीका अयोग्य ठरल्यानें सरकारी वकील मि० पाटकर यांनी केसरीचे संपादक न. चिं. केळकर यांस नोटीस काढण्याविषयी पुढीलप्रमाणें अर्ज केला.