Jump to content

पान:केशवसुत यांची कविता.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९६

केशवसुतांची कविता.

संध्येला प्रणयी तुम्ही जन सुखें द्या हो दुवा; मी करीं

हेवा तो न मुळीं; नसे प्रणय तो माझ्याहि का अन्तरीं ?

आहें मी घर सोडुनी पण दुरीं; चित्तीं म्हणूनी असें

मी संध्यासमयीं उदास; - अथवा व्हावें तरी मीं कसें ? ६

सावंतवाडी, जानेवारी, १८९३.