Jump to content

पान:केकावलि.djvu/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. गमो मधुर हे विष स्तवन; सेवितां मौजवी; नार्थ हालाहल विष प्राशन केले ह्या कथेचा उल्लेख करून जगन्नियमनाकरितांच शंकराला तिचा संहार करावा लागतो, वास्तविक तो करुणामय आहे; तसेंच संहारकर्त्या शंकराने जर जगत्कल्याणार्थ विपप्राशन केले तर मग तुमचे काम जगत्पालनाचे आहे तेव्हां तुम्ही भक्तांचे हित करालच कराल. इतक्या गोष्टी कवीने सुचविल्या, म्हणून 'हितकरा' ह्या हेतुगर्भ पदाच्या योजनेने परिकरालंकार झाला. ८. दयासमुद्रा! हे दयार्णवा! गरळ दुःसह असतांही केवळ लोककल्याणार्थ जसे महादेवाने त्याचे प्राशन केले तद्वत् स्वस्तुति जरी तुम्हांला दुःसह वाटली तरी केवळ आमच्या हिताकरितां तिचा आपण स्वीकार करावा-असा कवीचा अभिप्राय. 'कृत्तिवासा गरा इ०' येथे दृष्टांत अलंकार झाला आहे. याची उदाहरणे: (१) 'करिल कसें मांजर जें दुष्कर हरिहनन काज वाघास । न शकति अग्नि विधु; कसा दिनमणिचा करिल काजवा घास' ? (आदि०), (२) पडतांचि भीष्म गेले सर्वांचेही पळांत आवांके। नसतां धुरंधर ५ वृषभ वाळ वृषभरें करोनि आ वांके' (द्रोण०) [मागें केका ४, पृ० १३ टीप ४ पहा.], (३) द्रुपदं ह्मणे 'सत्य वदसि योग्य खल प्राप्तदर्प हा निधना । पावेल कसा चतुरहि न करूनि निधिस्थ सर्पहानि धना' १ ॥ (उद्योग० १. १५) १. हे स्तवन मधुर गमो, [पण] विष [आहे]; [कारण] [हें स्तवनरूप विष] सेवितां माजवी, सद्यशोमुख मलिन करी, हलाहला लाजवी; [हे] प्रभुवरा! [हे स्तवनरूप विष जो [तूं] सदा पिशी तो] तूं हरापरिस बरा. असा [विष] रस समर्पित्या [तूं] आपले अमृत ओपिशी-असा अन्वय. स्तवनाच्या अंगी दोष आहे हे ह्या केकेंत कवि दाखवितात. २. गोड. ३. विषासारखें (मादक आणि मारक म्हणून अपायकारी) स्तवन. हे (प्रस्तुत, सांगितलेले) विषासारखें स्तवन [लोकांना] मधुर (गोड) गमो (वाटो). सामान्य लोकांना स्तवन हे परिणामी अपायकारी आहे हे समजत नसून उलट गोड वाटते, तर ते खुशाल वाटो. बहुजनसमाजाला स्तुति अत्यंत प्रिय असून पुष्कळदां शहाणे लोकही स्तुतीच्या जाळ्यांत सांपडतात. याविषयीं आंग्ल कवि स्विफ्ट याच्या पुढील पंक्ति पहाव्या: Tis an old maxim in the Schools That flattery is the food of fools; Yet now and then your men of wit Will condescend to take a bit. श्रेष्ठलोकांपैकी थोड्यांला जरी स्तुतीचा कंटाळा असतो, तरी बहुतेकांच्या हृदयांत स्तवनप्रियता गुप्तपणे संचार करीत असते. अठराव्या शतकांत होऊन गेलेला आंग्ल कवि यंग याने पुढीलप्रमाणे आपल्या एका काव्यांत उद्गार काढले आहेतः The love of praise, howe'er concealed by art, Reigns more or less, and glows in every heart. ४. स्तवन हे कोणाला गोड वाटेल तर वाटो, परंतु ते विष आहे, कां कीं तें सेविलें.