________________
केकावलि. तिप्रिय म्हणून आरंभी विधान करून माझा स्तव करण्यास प्रवृत्त झालास, हे कसें! अशी भगवदाशंका मनांत आणून तिचे निवारण पुढील दहा केकेंत करीत होत्साते प्रथम सामान्यतः स्तवनाचे विगर्हितत्व कवि" प्रतिपादितात. (य० पां०-पृ० १३२.) १०. स्तुतीच्या दुःसहत्वामुळे कानावर हात ठेवितात. ११.समर्थ लोक. प्रभुप्रभवतीति प्रभुः, निग्रहानुग्रहसमर्थ. स्तुतीस योग्य असे सत्पुरुष देखील त्यांची स्तुति केली असतां 'विष्णवे नमः' म्हणून कानावर हात ठेवितात; स्तुति आपणास आवडत नाहीं असें दर्शवितात. १२. पोळतात काय? स्वस्तवन ऐकतांच कानावर हात ठेवतात याचें कारण त्यामुळे त्यांना पोळल्याप्रमाणे जणूं दुःसह वेदना होतात काय? कोणी म्हणेल जणूं काय ते भाजतात. श्रवण जणू काय पोळती यांत उत्प्रेक्षा अलंकार समजला तरी चालेल. येथे एखाद्याचे स्तवन ऐकून कान पोळत नाहींत-असे असतां, ते जणूं काय पोळतात असें मानिले आहे. उत्प्रेक्षेचे लक्षण असें:-'अन्यथैव स्थिता वृत्तिश्चेतनस्येतरस्य वा । अन्यथोत्प्रेक्ष्यते यत्र तामुत्प्रेक्षां विदुर्यथा. ॥' [दंडिकृत काव्यादर्श-३-२२१ पृ० २१४]. 'एकावरि इतराची सादृश्ये कल्पना सुकवि करिती । म्हणती तीस विचक्षण उत्प्रेक्षा षट्प्रकार ती धरिती ॥ १ ॥ की वस्तु, हेतु, फल या रूपांनी विविधता तिला घडते। त्यांत प्रथमा उक्तानुक्त पदार्था अशी द्विधा होते ॥ २॥ हेतु फलोत्प्रेक्षा त्या सिद्धासिद्धाश्रया अशा विविध । यापरि मिळोनि सकळा उत्प्रेक्षा वर्णिती सहाच बुध ॥३॥ स्वरूपोत्प्रेक्षा-उक्तपदार्था-'अस्तमयीं तम ये जे त्यावरि तकोक्ति होत बाकींच्या । वाटे विरहानीचा मज धूमसमूह चक्रवाकींच्या' ॥ (१). अनुक्तपदार्था-'हे निबिड तिमिर जाणों सर्वांगा लिंपितेच की काय । अजि काय गगन सांबुद कज्जलवृष्टीच करितसे हाय' ॥ (२). हेतूत्प्रेक्षा-सिद्धाश्रया व असिद्धाश्रया-'आरक्त तुझे मृदुपद हे सुंदरि सत्य भूमिविन्यासें । त्वन्मुख कांतीच्छेनें कमळाशी विधु विरोध करि भासे' ॥ (३).-फलोत्प्रेक्षा-सिद्धाश्रया-पीनकुचे! सुकृशोदरि ! कुचभार धरावयासि नियमानें। कटि बांधलीस बळकट काय कथीं प्रगट कनकदामानें'। (४). असिद्धाश्रया-जे सर्व काळहि जलीं वास करी विमळ कमळ सुंदरि ! तें। व्हाया त्वच्चरणाशी ऐक्य गमे प्रायशा तपचि करितें' ॥ (५).-(अ.वि.) अप्रकृताच्या धर्माच्या आरोपाची कल्पना अनिश्चितपणे प्रकृतावर बसविली म्हणजे उत्प्रेक्षालंकार होतो. उत्प्रेक्षालंकाराचा तपशील:ही कल्पना वस्तु किंवा स्वरूप, हेतु (कारण) आणि फल या तिहींच्या ऐक्याच्या आश्रयाने होते म्हणन उत्प्रेक्षा तीन प्रकारची होय. त्यांत कांहीएक पदार्थास दुसऱ्या पदार्थाच्या एकत्वाची कल्पना केली तर स्वरूपोत्प्रेक्षा किंवा वस्तूत्प्रेक्षा होते. तसेच एखादा पदार्थ कोणत्या कार्यास कारण झाला नसून कारणत्वाची कल्पना केली म्हणजे ती हेतूत्प्रेक्षा. आणि एखादी वस्तु कोणाचें फल नसून त्यावर फलत्वाची कल्पना वसविली म्हणजे ती फलोत्प्रेक्षा होते. स्वरूपोत्प्रेक्षेत उक्तपदार्थ म्हणजे वर्णनीय पदार्थ सांगितला असला तर ती उक्तपदार्था स्वरूपोत्प्रेक्षा होते. वर्णनीय पदार्थ सांगितला नसला म्हणजे अनुक्तपदार्था स्वरूपोत्प्रेक्षा. हेतूत्प्रेक्षा व फलोत्प्रेक्षा ह्या प्रत्येकी दोन प्रकारच्या आहेत मि द्धाश्रया व असिद्धाश्रया. जिचा विषय प्रसिद्ध आहे ती सिद्धाश्रया, व विषय प्रसिद्ध नसला असिद्धाश्रया. उत्प्रेक्षेची उदाहरणे:-(१) असें बोलूनी नळे रंजवीला । अंजुळी माजी हंस बेस