पान:केकावलि.djvu/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. 'अतयं महिमा तुझा, गुणहि फार, बा! हे,' विधी । श्रुतिज्ञहि ह्मणे सदा, स्तविल आमुची केंवि धी?।। १. 'बा! [देवा!] तुझा महिमा अतर्क्स, [आणि तुझे] गुणहि फार.' [असें] श्रुतिज्ञहि विधी सदा म्हणे. [मग आमुची धी केंवि [तुला स्तविल? [जरी तुझा यथार्थ स्तव करणे अशक्य आहे तरी जन (साधुजन) [तुला यथामति स्तवुनि सन्मती जाहले. तुझिया स्तवार्थ तुझ्या सम कवी कधीं जन्मती? असा अन्वय. भगवत्स्तव करणे मनुष्याच्या बुद्धीस अशक्य असे दर्शविण्याच्या उद्देशाने कवि म्हणतात. अतळ-तर्क करण्यास अशक्य. तुझा महिमा असा आहे की त्याचा विचार करितांना आमची बुद्धि कुंठित होते. ईश्वरमहिमा तर्काच्याही पलीकडे आहे, तेव्हां तो वाणीने वर्णन करणे अशक्य. केनोपनिषदांतील पुढील वचनांत वाणी, मन, चक्षु, श्रोत्र, व प्राण यांना स्वविषयग्रहणसामर्थ्य ईश्वरापासून मिळाले असून यांच्या मात्र गति ईश्वराचे अत्यल्प देखील ज्ञान मिळविण्यांत अत्यंत कुंठित होतात हेच सांगितले आहे:-'यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते । तदेव ब्रह्म तं विद्धि नेदं यदिदमुपासते ॥१॥ यन्मनसा न मनुते येनाहुर्मनो मतं । तदेव०२ ॥ यच्चक्षुषा न पश्यति येन चढूंषि पश्यति । तदेव० ३ ॥ यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं । तदेव० ४ ॥ यत्प्राणेन न प्राणिति येन प्राणः प्राणीयते । तदेव० ५ ॥ २. महिमा, गरिमा, लघिमा, इत्यादि जे इमनिच् प्रत्ययान्त मूळचे संस्कृत शब्द त्यांचा येथे कवींनी मूळ संस्कृताप्रमाणे पुलिंगी प्रयोग केला; परंतु मराठीत क्वचित् हे शब्द स्त्रीलिंगीही मानतात. वामन म्हणतात:-'जो न गाय हरिचे महिमेला, तो असे जितचि या महिं मेला ॥.' महिमा हा शब्द महा (महत्) या विशेषणास इमन् प्रत्यय लागून झाला आहे. हा प्रत्यय भाव किंवा धर्म या अर्थी होतो; जसें-शुक्ल, शुक्लिमन् (पांढरेपणा); पृथु, प्रथिमन् • (मोठेपणा); मृदु, म्रदिमन् (मृदुपणा); महत्, महिमन् ; गुरु, गरिमन् ; इ० ३. गुणहि फार= तुझे गुण अनंत आहेत. तुझे गुण कोणाच्यानेही मोजवले जाणार नाहीत. 'मतीवीण काय वर्ण तुझें ध्यान । जेथें पडिलें मौन वेदश्रुती ॥' [तुकाराम-अभंग २५४४.] ४. ब्रह्मदेव. ५. वेदवेत्ता (ब्रह्मदेव). कथासंदर्भ:-ब्रह्मदेव आपल्या चार मुखांनी चतुर्वेदांचे नेहमी पारायण करितो. वेदवेत्ता ब्रह्मदेव देखील भगवंताचा महिमा अवर्ण्य आणि गुण अगण्य असें ह्मणतो. भगवंताच्या महिम्याचे वर्णन वेदांना व वेदवित् ब्रह्मदेव यालाही करवत नाही. शंकराचार्यांनीही भगवत्स्तुतींत असेंच म्हटले आहे:- 'यं वर्णयितुं साक्षात् अतिरपि मूकेव मौनमावहति.' ज्याचे वर्णन करणे अशक्य समजून श्रुति देखील मौन धारण करिते. अर्थः-ज्या प्रभूचे वर्णन करण्यास अध्यात्म विद्युत अत्यंत निपुण, त्रिमूर्तिपैकी एक, प्रत्यक्ष भगवंताच्या नाभिकमळापासून जो उत्पन्न झाला असा चतुर्मुखी ब्रह्मदेवही जर समर्थ झाला नाही तर मग आमच्या सारख्या अल्पमति, वेदाचे ज्ञान नसणाऱ्या एकमुखी मनुष्यांचा काय पाड? कथासंदर्भ:-गोकुळांत भगवंताने सो खरच कृष्णरूपाने अवतार घेतला की काय म्हणून पहाण्याकरितां एकदा ब्रह्मदेवाने गोकुळांतील