Jump to content

पान:केकावलि.djvu/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुसन्या आवृत्तीची प्रस्तावना. पहिली आवृत्ति प्रसिद्ध झाल्यावर सुमारे एका वर्षाच्या आंतच पहिली आवृत्ति संपून दुसरी आवृत्ति काढण्याची मला माझे मित्र शेट तुकारामजी यांजकडून सूचना झाली. तेव्हापासून ह्या दुसऱ्या आवृत्तीची तयारी चालली, पण मध्यंतरी अनेक अडचणी आल्यामुळे आजपर्यंत ही आवृत्ति प्रसिद्ध करितां आली नाही. पहिल्या आवृत्तीवर अनेक विद्वानांनी आपले अनुकूळ अभिप्राय दिले व अनेकांकडून दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी अमुक अमुक सुधारणा कराव्या हाणून सप्रेम सूचनाही आल्या. त्या सर्वांचा योग्य विचार करून ही आवृत्ति आज प्रसिद्ध केली आहे. ही बाहेर पडण्यास जरी भारी वेळ (सुमारे तीन सवातीन वर्षे) लागला तरी त्या मानाने रसिक वाचकांस हिच्यांत भरपूर मोबदला मिळेल अशी तजवीज केली आहे. मोरोपंतांचे चरित्र बरेंच विस्तृत दिले असून टीपांतही पुष्कळच सुधारणा केली आहे. अलंकारांच्या टीपा, समानार्थक उतारे, पौराणिक रूपकें वगैरे पुष्कळ विषय टीपांतून वाढविले किंवा नवीन घातले असून विद्यार्थ्यास अवश्यक अशी माहिती जाड टायपांत दिली आहे. विद्यार्थ्यांच्या व इतर वाचकांच्या सोयीकरितां केकावली'चें मूळ (१२२ केका.) आरंभी छापले आहे. त्यांत विषयाची संगति दाखविण्याचा यत्न केला असून मधून मधून विषयानुरोधाने चित्रेही घातली आहेत. सामान्य वि. द्यार्थ्यांस अनवश्यक वाटली तरी मोरोपंताचे हे काव्य उत्कृष्टरीतीने समजण्यास पुष्कळांस अवश्यक वाटणारी अवांतर उपयुक्त माहिती बारीक टायपांतून दिली आहे व त्यांतील मजकुराचे धोरण कळण्याकरिता सूचक शिरोभाग जाड टायपांत छापले आहेत. केकावलीच्या टीपांच्या अखेर केकावलीच्या सहा उपयुक्त पुरवण्या दिल्या असून त्यापुढे मोरोपंतांच्या चरित्राची ह्मणून एकोणीस परिशिष्टे दिली आहेत. पुरवण्या व परिशिष्टे वाचकांस पंतांच्या काव्याची गोडी लागून त्यांच्या इतर काव्यांचा त्यांनी प्रसार करावा व पंतांप्रमाणेच त्यांनीही यथाशक्ति आपल्या मातृभाषेची मनोभावे सेवा करण्यास झटावें ह्मणून अतिशय परिश्रम घेऊन तयार केली आहेत. हा आवृत्ति तयार करितांना मला संस्कृत, प्राकृत व इंग्रजी पुष्कळ ग्रंथांचा फार उपयोग झाला व माझ्या पुष्कळ मित्रांनी मला उपयुक्त सूचना करून फार उत्तेजन दिले याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. त्या सर्वांची नांवें विस्तारभयास्तव येथे देता आली नाहीत ह्मणून खेद वाटतो. विशेषतः मित्र रा. लक्ष्मणराव पांगारकर । बा. ए. शिक्षक पंढरपुर हायस्कुल, यांच्यापासून पंतांच्या चरित्राविषयी मला पुष्कळ उपयुक्त माहिती मिळाली व माझे मित्र शेट तुकारामजी निर्णयसागरचे मालक यांनी या आवृत्तीच अंतरंग व बहिरंग ही दोन्ही उत्कृष्ट व्हावी ह्मणून मला लागली