________________
( ३५ ) (केका १), 'कवीश्वरमनःपयोनिधिसुतास्तुति' (के०३२), 'समुज्वल दयासुधासीकर' (के०३७), 'सुदुस्तरविपन्नदीसेतु' (के० ४२), 'अतिदुःसहस्वगदशत्रु' (के. ४४), 'कृतांतकटकामलध्वजजरा' (के० ४६), 'जगत्रयनमस्क्रियाभाजन' (के० ६३), 'सितासिताभिदनदीसदोघ' (के० १०६), 'अमृतोदधिप्रभवपुंडरीकामला' (के०११०), 'बृहदुदारलीलाकर' (के० ४३). शिवाय केका १,२,६,१०,१६,१७,१९,२४, ३३,३४,३६,३८,४२,४५,४९,६१,८०,८३,९२,९५ इत्यादि पहा. तसेंच पंतांनी आपल्या इतर काव्यांप्रमाणे यांतही परक्या भाषेतील शब्दांचा उपयोग करून भाषेस जास्त प्रौढता व सधनता आणलेली आढळते. या लहानशा काव्यांत परक्या भाषेतील सुमारे १२ शब्द आले आहेत. हवाला (के० १५), दावा (के० २१), सोमल (के० १०६) हे तीन आरबी शब्द, मर्द (के० ४३), बरोबरी (के० ६४), दाई (के० ९७), मिरवणे (के० ५१) हे चार फारशी शब्द व खासदार (के० ७), चाकर (के० ६७), लुबरा (के० ७२), धोपटणे (के० ८५), तोटा (के० ९७) हे पांच हिंदुस्थानी भाषेतील शब्द आहेत. (२) अलंकारवैपुल्य. यांत अर्थालंकार विपुल आहेत. बहुशः प्रत्येक केकेंत एखाददुसरा ठळक अलंकार दृष्टीस पडतो. 'केकावली'काव्यांत पुष्कळच अर्थालंकार आले आहेत, ही गोष्ट पुरवणी ३ पहाणारांस कळून येईल. अनुप्रास, श्लेष वगैरे शब्दालंकारांचा भरणा बराच आहे. अनुप्रासाची उदाहरणें केका १,३३,३५,४९, ६२,९२,११८,११९ इत्यादि पहा. केका २१,८४,९२ ही यमकालंकाराची उदाहरणे. २१ व्या केकेंत नवाक्षरी यमक आहे. केका ११८,११९ त पुष्पयमक आहे. या काव्यांत सुमारे २५ निरनिराळ्या शब्दांवर कवीने शब्द श्लेषांची व अर्थश्लेषांची योजना केलेली आढळते. त्यांपैकी बहुतेकांचा उल्लेख टीपांत केला आहे. पुढील शब्दांवर श्लेषयोजना केलेली आहे:-(१) सुदुर्धर, उद्धरा, पतित, (के०५), समुद्धरसि (के. ४३), (२) काढिल्या (के. ७), (३) अमृत (के० ३१,४१,९०. ९१,१०४,१०५), (४) निजात्मजाग्रह विमुक्त (के० ३३), (५) हरिमनोहराकति (के • ३६), हरि (के० १२१), (६) जडासि (के० ४३,७६), (७) गदांसवें (के० ४६), (८) वन (के. ४८), (९) नव सुधानवद्या (के० ५१), (१०) सदंड (के० ५४), (११) परस्वा (के० ५७), (१२) रस (के० ५७,५८,१०१), (१३) मल (के० ५८), (१४) वत्स (के० ५८), (१५) ध्रुव (के० ६५), (१६) वरासवें (के० ६८), (१७) मयूर (के० ७०,१२२), (१८) छळ (के० ७५), (१९) अधोगती (के० ७५), (२०) बळी (के० ७६), (२१) संचितें (के० १०५), (२२) राम (के० १२२), (२३) गुरु (के० १२२), (२४) रानट (के० १२२), (२५) कवि (के. १२२). मोरोपंतांच्या 'केकावली'तील श्लोकांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात असा पुष्कळ लोकांचा पूर्वी समज होता व अजूनही कित्येक हरदास