________________
( ३४ ) आढळतो त्याचे कारण केवळ 'वाचमोऽनुधावति' अशा योग्यतेच्या 'पुराणकवी'चे ग्रंथच नसून भक्तिमार्गाचा अथवा भागवतधर्माचा खरोखर प्रचार पाडण्यास कायावाचामनेंकरून झटणाऱ्या ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम यांसारख्या अर्वाचीन संतकवींची प्रेमरसभरित कविता होय. किंबहुना पंतांच्या मनावर पहिल्या, पेक्षा दुसऱ्याच मंडळीचा व त्यांतही साधु तुकारामाच्या अभंगवाणीचा विशेष परिणाम झाला असे म्हणण्यास चिंता नाही. 'केकावली' वरील टीपांत अर्थसादृश्याचे जे उतारे दिले आहेत व 'सन्मणिमाला' व इतर स्फुटप्रकरणांत पंतांनी या संतमंड ळीचा जो गौरव केला आहे त्यावरून ह्या विधानाची सत्यता बरीच कळून येईल. हे काव्य इतकें सरस, प्रौढ व चेतोहर बनण्याचे दुसरे कारण कवीने ते आपल्या उत्तरवयांत व तेंही अगदी शेवटी शेवटी रचिलें हे होय. पंतांनी स्फुटप्रकरणांपैकी पुष्कळ प्रकरणे आपल्या उत्तरवयांत रचिली असावी असे त्यांतील भाषापद्धतीवरून व इतर मजकुरावरून वाटते. त्यांपेक्षाही हे काव्य अलिकडचे असावे असें अंतःप्रमाणांवरून कळतें. केका १० तील 'गंगेची उक्ति', केका ११ तील 'अनेक देवांस वारंवार शरण जाणे,' केका ३२, ३३ तील 'साधुजनांची स्तुतिग्रहणपराङ्मुखता व तत्कृत भगवद्गुणवर्णन' यावरून साधुसंतांच्या स्तुतिपर कविता केल्यानंतर केकावलि' काव्य रचिले असा कवीचा गुप्त अभिप्राय व केका ४६,४७ तील 'स्ववृद्धावस्थेचे कवीने केलेले वर्णन व मरणापूर्वी माझा उद्धार करा अशी भगवंतास केलेली प्रार्थना' ह्यावरून कवीने काशीयात्रा केल्यावर काही दिवसांनी म्हणूनच अगदी शेवटी शेवटी हे काव्य रचिले असावें असे वाटते. 'केकावलि' काव्यांत पंतांच्या एकंदर काव्यांतील बहुतेक गुण ठळकपणे आढळतात. हे काव्य इतकें सुरस उतरले आहे की मोरोपंतांच्या ज्या दोन काव्यांवर संस्कृतांत टीका झाल्या आहेत त्यांत मंत्रभागवत' हे एक काव्य असून दुसरे काव्य सदर 'केकावली' हे होय, मुंबईग्रंथसंग्रहालयांत ह्या टीकेची हस्तलिखित प्रत आहे. टीका थोडी लहान पण चांगली आहे. यास्तव त्यांच्या काव्यसुधेची ज्यांना थोडक्यांत चव व्यावयाची असेल त्यांनी हे काव्य वाचावें. पंतांचे यमकचातुर्य मात्र हे काव्य श्लोकबद्ध असल्यामुळे फारसें आढळणार नाही. तरी तिचा थोडाबहुत मासला यांत पहावयास सांपडेल. आतां या काव्यांतील प्रमुखगुण व विशेष गोष्टी म्हटल्या म्हणजे पुढील होतः - (१) भाषाप्रौढी व अर्थप्रौढी. 'गीर्वाण शब्द पुष्कळ, जनपद भाषाचि देखता थोडी' असें पंतानी 'मंत्ररामायणा'च्या उपोद्घातांत आपल्या कवितेचें जें वर्णन १५ आहे तें यथार्थ होय असे हे काव्य वाचून समजेल, संस्कृतशब्दप्राचुर्यामुळ. दीर्घ समासांमुळे भाषेला प्रौढत्व आले आहे. काही केका तर जवळ जवळ सबध र स्कृतच आहेत व पुष्कळांची संस्कृत भाषांतरें अल्प प्रयासाने करितां येतील इतक्या त्या संस्कृतशब्दप्रचुर आहेत. केका ४६ चे संस्कृत भाषांतर टीत दिले आहे. पहाव. अर्थाच्या प्रौढतेसंबंधाने कोणच्याही चार केका वाचन पाहिल्या म्हणजे साची काही निवडक उदाहरणे पहाः-'गदारिदरनंदकांबुजघरा