पान:केकावलि.djvu/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना. सुमारे तीन वर्षांपूर्वी कै. वामनराव ओक ह्यांनी मला 'काव्यसंग्रहा'करितां 'केकावली'वर विस्तृत टीका लिहिण्यास सांगितली. माझ्याने हे अवघड काम होणार नाही हाणून मी तें प्रथम नाकारिलें, पण त्यांचा व इतर मित्रमंडळीचा आग्रह पडल्यामुळे मला भीतभीतच का होईना, परंतु तें काम शेवटी पत्करावे लागले. नंतर ह्या कामास उपयोगी पडतील अशा पुस्तकांची जुळवाजुळव करून मी सबंध एक वर्ष केकावलि, यशोदापांडुरंगी, केकादर्श, ज्ञानप्रसारकांतील यशोदापांडुरंगीवरील विवेचन हे तीन केकावलीवरील टीकाग्रंथ व तत्संबंधी इतर ग्रंथ वाचण्यांत घालविले. हे काव्य पंतांच्या सर्व काव्यांतील गुणावगुणांचे उत्तम निदर्शक आहे, ह्याचा प्रत्यय पाहण्यास मला पंतांचे पुष्कळ काव्यग्रंथ लक्ष्यपूर्वक वाचावे लागले. तसेच अर्थसादृश्याचे उतारे देण्याचे ठरल्यामुळे प्राचीन कवींपैकी काहींच्या ग्रंथांची व विशेषतः अर्वाचीन संतकवींच्या काव्यांची चांगली माहिती करून घेणे मला आवश्यक वाटल्यावरून मी तसे केले. इतक्या गोष्टी झाल्यावर मी टीपा लिहिण्यास सुरवात करून काही महिन्यांनी ते काम संपविले. हप्त्याहप्त्यांनी मी लिहिलेला मजकूर वामनरावजींकडे पाठवित असें. सर्व ग्रंथ संपल्यावर, तो सर्व तपासून, योग्य वाटले ते त्यांत फेरफार करून व काही नवीन मजकूर त्यांत घालून गेल्याच्या मागील एप्रिल महिन्याच्या सुमारास त्यांनी तो सर्व मजकूर 'काव्यसंग्रहां'त छापविण्यास मुंबईस पाठविला. गेल्या वर्षाच्या झणजे १८९६ च्या मेपासून डिसेंबरपर्यंतच्या सर्व अंकांत 'केकावली' वरील सर्व टीका छापून प्रसिद्ध झाली आहे. केकावलि हे काव्य पुस्तकरूपाने स्वतंत्र छापून निघाल्यास महाराष्ट्र वाचकांपैकी बऱ्याच जणांस तें घेणे सोईचे पडेल व विशेषतः मुंबईविश्वविद्यालयांतील यू. एस. एफ.च्या परीक्षेस हे काव्य नेमले असल्यामुळे मराठी घेऊन त्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांस व मद्रास विश्वविद्यालयांतील मराठी भाषा घेणाऱ्या विद्यास त्याचा फार उपयोग होईल असें बऱ्याच लोकांचे झणणे पडल्यावरून त्या काव्याची ही स्वतंत्र आवृत्ति काढली आहे. परीक्षेस नेमलेल्या इंग्रजी काव्यग्रंथांच्या धर्तीवर ह्याला मोरोपंतकवीचे चरित्र व 'केकावली'ची प्रस्तावना हे दोन नवीन निबंध लिहून जोडले आहेत. पहिल्या निबंधांत कविचरित्र देतांना पंतांच्या एकंदर काव्यांतील गुणदोषांचे संक्षिप्त विवरण केले असून, दुसरीत केकावलीसंबंधी विशेष रीतीने दोन शब्द लिहिले आहेत. तसेंच काव्यवृत्तावर दोन शब्द लिहिले असून ह्यांत आलेल्या अलंकारांची व केकावलींतील श्लोकांच्या प्रथमचरणांची सूची पुरवणीत जोडल्या आहेत. ह्याप्रमाणे मोरोपंतांच्या ह्या काव्याचा मार्मिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यास वपंतांच्या