पान:केकावलि.djvu/379

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ७२ ) (सत्वरामायणांतील) श्रीमान् गाधिजराज या दशरथा मागे महात्मा सखा ओजस्वी तनय, क्षपाचरहता राखावयाला मखा;। दे व्हाया जय रामलक्ष्मण जगच्छ्रेयस्करे मापती, । ते रात्रिंचर मर्दुनी, विनविती त्या कौशिकाची मती. ॥ ३ ६-१५ स्तोत्ररामायणे. या दहा स्तोत्ररामायणांत सुप्रसिद्ध 'विष्णुसहस्रनाम' या स्तोत्रांतील हजार नांवें प्रत्येक रामायणांत शंभर प्रमाणे गुंफिलीं आहेत. याचा मासलाः(प्रथमस्तोत्ररामायण) विश्वस्रष्टा विष्णुप्रति विनवी दशमुखक्षयार्थ, तया । वर वेदशास्त्रषट्रका रक्षाया दे जगीं करूनि दया. ॥ १ भूपस्तुतभव्ययशा रविकुलभव सत्प्रभु प्रथित भारी । जो दशरथ प्रभूतद्विजहित असकृत सुरव्यसन वारी. ॥ २ (नवमस्तोत्ररामायण) किति बुध सनात् सनातनतम कपिल असें रघूद्वहा ह्मणती, । कपि पापांचा अव्यय यापरि संस्तविति, करिति या प्रणती. ॥ ८२ ॥ (दशमस्तोत्ररामायण)वदला प्रणतां सर्वो, 'संरक्षीनचि बुधाबुध वा मी';। भक्तमयूरदयाघन हा सर्वप्रहरणायुध खामी. ॥ ८३ याचप्रमाणे ६ व्या प्राकृतमंत्ररामायणाच्या उत्तरकांडांत रामरक्षास्तोत्र पंतांनी गुंफिलें आहे हे रसज्ञांस सुविदितच आहे. १६,१६२,२०,२१ यांत ह्मणजे (प्रथम) शिवरामायण, उमारामायण, काशीरामायण, प्रयागरामायण, गंगारामायण व यांतील प्रत्येक गीतींत अनुक्रमें शिव, उमा, काशी प्रयाग व गंगा अशी नांवें साधिली आहेत. १७ व्या ह्मणजे द्वितीय शिवरामा यणांत शिवाच्या अष्टोत्तरशत नांवांचा संग्रह केला आहे. २२,२३,२४,२५ त हणजे तीर्थरामायण, ऋषिरामायण, राजरामायण, च सन्नामगर्भरामायण यांतील प्रत्येक गीतींत अनुक्रमें एका तीर्थाचें, राजाचे व दक्ष मुनिसंतसाधुभक्ताचें नांव गोविले आहे. मासल्याकरितां पुढील उदाहरणे पहाः तीर्थरामायणांतील ५८ गीतीत पुष्कर, सरयू, गंडकी, गोमती, शोणभद्र, फल्गु...:: शिवगंगा, महान्हद, कावेरी, ताम्रपर्णी, सेतुवाहिनी ह्या तीर्थांची नांवें गोंवून शेवटच्या गातार सर्वतीर्थ हे नांव पंतांनी साधिले आहे. तें असें: श्रीराम सकळहितकर निर्जरतर्वधिकचरणकंजरजा । जगतीश पुमर्थप्रद यश करि कवि ह्मणति वज्रपंजर ज्या. ॥ ५९ तसेंच ऋषिरामायणांत यवक्रीत, रैभ्य, कक्षीवान् , औषिज, भृगु......निशाकर, शंख, लिखित, पराशर, वालखिल्य, अशी नांवें गोंवून शेवटीं सर्वर्षि हे नांव साधिले आहे. उदाहरण: केला भूप विभीषण अभिषेक अणीक मांडवुनि भव्य,। दिव्योत्तीर्णा देवी प्रभुचा उत्संग शोभवी सव्य. ॥ ६७.