Jump to content

पान:केकावलि.djvu/378

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- (७१) native publications 1867 by Rao Bahadur M. G. Ranade.) 'मोरोपंतांनी रचिलेली त-हेत-हेची रामायणे ही महाराष्ट्र ग्रंथसंग्रहांतील एक चमत्कारिक व अपूर्व चीज होय.' (१८६७ पर्यंत छापलेल्या मराठी ग्रंथावरील रावबहादुर रानड्यांचा रिपोर्ट ). १ मात्रारामायण. यांत 'अ'पासून 'ज्ञ'पर्यंत बहुतेक वर्ण गीतींच्या आरंभी योजून रचना केली आहे. त्यांत 'अ', 'ट', 'ण' व 'ज्ञ' हे वर्ण कसे खुबीने योजिले आहेत ते पहा:-- अस्त्र शस्त्र प्रार्थिति, परि धैर्य धरी चरित्र वाढाया.। १३ टपकरि मागे घेउनि गेली स्त्री त्या दशानना क्षुद्रा. । २२. 'ण' पुढे, मागें 'रा' ज्या, तो राय कपीस भेटला, वानी; । २६ ज्ञहि अज्ञहि जन तारी नामें कामादि शत्रुही मारी। खयशें भवभय वारी, करि भक्तमयूरघन दया भारी. ॥ ४६ । २ नामांक रामायण-यांत पूर्वार्धाच्या आरंभी 'रा' व उत्तरार्धाच्या आरंभी 'म' याप्रमाणे प्रत्येक गीतींत रामनाम साधिले आहे. यांतील पहिली गीति अशी आहे: राजीवोद्भव विनवी विश्वाहितदशमुखासि माराया;। मधुकैटभारि दशरथसुत होय, त्रिभुवनासि ताराया. ॥ १ ॥ ३ मंत्रमय रामायण-यांत प्रत्येक गीतींत श्रीरामजयरामजयजयराम हा मंत्र साधिला आहे. याची दोन उदाहरणे:-(सीतास्वयंवरप्रसंगाचे वर्णन) श्रीगलशरासन मथुनि, जय करुनि, धरामनोव्यथा हरिली; । जनकयजनायतनजा, राजसभामद हरूनियां, वरिली. ॥ ५ रामराज्याचे वर्णन) श्रीदचि पुरामधिल जन, सुज्ञान सदय खरा पर महर्षी । जलदोदय वनजनयन, सर्व मयूरापरी परम हर्षी. ॥ २४ -9 १५.३३,४०,४१,४२,या रामायणांत ह्मणजे बालमंत्ररामायण, प्राकृत मंत्ररामायण, मंत्रगर्भ साकीरामायण, मंत्रिरामायण (अनुष्टुपछंद), सप्तमंत्ररामायण, (अनुष्टपछंद), संस्कृतमंत्ररामायण यांत, तसेंच ७२ व्या रम्यरामायणांत श्रीरामजयरामजयजयराम हा त्रयोदशाक्षरी मंत्र साधिला असून तो बालकांडांत प्रत्येक वृत्ताच्या पहिल्या चरणाच्या पहिल्या अक्षरांत, अयोध्याकांडांत दुसऱ्या अक्षरांत, अरण्यकांडांत तिसऱ्या अक्षरांत याप्रमाणे क्रमाने शेवटच्या उत्तरकांडांत सातव्या अक्षरांत आला आहे. ६४,६५,. त्रिःसप्तमंत्ररामायण, व सत्स्वरामायण यांत प्रत्येक श्लोकांत सबंध त्रयोदशाक्षरी मंत्र आलेला आहे. याची उदाहरणे:(त्रिःसप्तमंत्ररामायणांतील) श्रीकंठादिसुरर्षिसंस्तुत धरादेवामराच्या हिता। जन्मे यक्षवरानुजप्रमथना सूर्यान्वयीं, रक्षिता । धर्माचा मनुज, स्वयें यश जगी व्हाया, भय ध्वंसिता, झाला राघव दिग्रथात्मज महातेजा विधीचा पिता. ॥ १