पान:केकावलि.djvu/370

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९) तो येउनि सद्भावें, स्वउरी प्रभुपादपंकजें कवळी. ॥ (कर्ण २२, १३) (२०) स्वआयु (आश्रम. २,६०) (२१) 'तेजओका' कर्ण ३२, ९:, (२२) निजओक (मंत्रभाग. १०-४०७) (२३) सत्वउडुप (द्रोण. २२-२०) (१२) समास नसून संधि केल्याची उदाहरणेः-(१) कुरवाळी (कुरव अळी) [ द्रोणपर्व १५, ८० ] (२) रण जनविस्मयकारक दारकयुग्मासवें असें रामें । केलें खरतर शरवरधरकरपर्दो गुणांचियारामें (=गुणाचिया आरामें) [कुशलवोपाख्यान ] (३) असाधु अथवा साधु परंत्वत्याज्य (=परंतु अत्याज्य ) लेंकरूं ॥ [कुशल० ४, ५२ ] (४) मातर्नमस्ते क्षमस्वापराधी (=क्षमख अपराधी) न [कुशलवो० ४, ३२] (५) होतां वृथाग्निने तुज मृत्यु नृपा हा अनिष्ट मज वाटे. ॥ (आश्रमवासी ७, १५)(-वृथा अग्निनें). (६) ग्रंथकृदजरामर (=ग्रंथकृत्+अजरामर) (अनुशा १,५५). (१३) षष्ठी विभक्ति व तिचा संबंधवाचक शब्द (दूरान्वय):-मयूरकवीच्या काव्यांत षष्ठी विभक्ति एकीकडे तिचा संबंधवाचक शब्द भलतीकडे असा प्रकार पुष्कळदा आढळतो. परंतु तो संबंधवाचक शब्द कवितेत अशा खुबीनें ठेविलेला असतो की षष्ठी विभक्तीचा संबंध इतर शब्दांशी न लागतां त्याच दूरस्थ शब्दाशी लागावा. त्यांची काही उदाहरणे:-(१) ज्यांत शुकाच्या केलें प्रकट कथुनि धर्मराजयश ताते ॥ (स्वर्गारोहण २, ३०) (२) दिधलें सत्यवतीच्या पुण्य, यश, अनं. तशर्म दायादें ॥ (स्वर्गारोहण २, ३१) (३) प्रभुचा मर्मी हाणी सर्वांसहि तीन तीन शर भाचा. ॥ (द्रोणपर्व) (४) ज्याचा शास्त्रीं शस्त्री व्यवहारी वासुदेववत् समज ॥ (द्रोणपर्व) (५) चैत्राचिया प्रतीक्षा करि दीक्षा द्यावयारि पुनिवेची (अश्वमेध. ४, ९९) (६) रे उत्तरा ! शकुनिचा या व्यूहांत न दिसे मला भाचा.॥ (विराटपर्व) (७) आर्ताच्या कां देइल धर्मज्ञ न हाक विप्रसादास ? (अश्वमेध ७,३६). महाराष्ट्र संयोजक संस्था १११ साविक फेल. .