पान:केकावलि.djvu/337

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३०) जसे होती देव प्रमुदित शचीनायक वनी, । तसे सारज्ञाते बुधजन मयूरेश कवनी; ॥ १५ ॥ (मंत्र. उपसं. १२) माजी सत्कृति दूषिली जरि खळें उच्छंखळे आग्रहें,। सेवावीच परंतु नित्य रसिकें हे सद्गुणाच्या गृहे;॥ चंडाळ त्रिदशापगेंत वमला की धेनुला स्पर्शला, । त्यांचे श्रोत्रियदेवसेव्य पयही, त्याही सदा निर्मला. ॥ १६ ॥ (मंत्र. उपसं. १३) खळ निंदिति ह्मणुनि बुधे टाकावी काय हरिगुणासक्ति । 'दीरनणंदाजाचें साध्वी न त्यागिती सुपतिभक्ति. ॥ १७ ॥ (मंत्ररा. उपसंहार ५) | काव्य करावें म्यां नच वचकावें दूषिती परि लघूस । कां न सदन वांधावें की त्यांत पुढे बिळे करिल घूस. ॥ १८ ॥ (सन्मनोरथराजि ९) हा कवि मयूर हर्षे सद्धन पाहोनि सरस नाचावा, । अति विस्मयें ह्मणावें, खळ हो! निंदूनि न रसना चावा. ॥ १९ ॥ (सन्मनो. ७०) प्राकृत ह्मणोनि निर्भर हांसोत अतज्ञ नीच मत्कृतिला। परि जाणशील वा ! तूं रसिक कविवरा ! मनी चमत्कृतिला. ॥ २० ॥ (नामरसायन ६९) तुमच्या पदप्रसादें फार चमत्कार अर्थ यमकांचे । त्यांत प्रभुयश, तद्वशजगदुद्धाराधिनेंचि यम कांचे ॥ २१ ॥ (नामरसा. ६९) प्रेम, प्रतिभा, शिक्षारीति पहा, आयका बरे कवन;। पवनप्रियपुत्रा ! वा ! म्यां हें केलें न निजगुणस्तवन. ॥ २२ ॥ (नामरसा. १०३) आर्यामुक्तामाला दावीन परंतु जरि न मागाल;। लागाल प्रभुकटी घालूं, फुगवील की रमा गाल. ॥ २३ ॥ (नामरसायन १०९) संत मयूरेश्वर कृत कवनी नवनीत कोमळी गोडी। घेतील की तयाची करणे परगुणविवृद्धि ही जोडी. ॥ २४ ॥ (प्रश्नोत्तररत्नमाला, उपसंहार) पद्माकांत पहींच 'कृष्णविजय' ग्रंथांबुजन्मांजली । भावें वंदुनि अर्पिला हरिजनांमध्ये किती जे अली, । ते याचा रस सेवितीलचि शिरीं वाहेल सन्मंडली । .. ..... हा स्वस्वामिपदप्रसाद खल तो भीतील जैसा कली. ॥ २५ ॥ (कृष्ण० ९० उपसं. ४).