पान:केकावलि.djvu/336

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट-ऊ. मोरोपंताच्या स्वकाव्याविषयी अभिमानोक्ति व निंदकास वाग्बाण. ऐका सज्जन हो ! भवद्वच खरें, आश्चर्य म्यां पाहिले, वाल्मीकिप्रभृति स्ववंदिनिकरी दीना मला वाहिले.। केलें प्राकृत काव्य ईश्वरपदी धत्तूरसें वाहिले, सांगू काय वरप्रसाद ? अजि तें व्यासेंहि की साहिले. ॥१॥ (आदि. ३७ १०४) आर्येला मानियले बहु पाहुनि सज्जनीं चमत्कृतिला । खळचि न मानिति, तैसे बहु दूषणसज्ज नीच मत्कृतिला ॥ २ ॥ ( सभा. ५११५) रामघनमयूर ह्मणे निववालचि सुरसिकांसि केका हो ! शंभुहि ह्मणे न सेविति मंद ह्मणुनि झुरसि काशिके का हो ? ॥३॥ (वनपर्व १३-१०८) रामघन सत्प्रसादामृत जों जो बहु वळोनि वर्षतसे । तों तों भक्त मयूर स्वार्याकेका करूनि हर्षतसे. ॥ ४ ॥ (विराट. ७-३७). श्रीनारद वाल्मीकि व्यास पराशर वशिष्ठ शुक सुकवि । प्रतिभारक्षक; नाशक खळ किति ? अमृताश्रिता दव न सुकवि. ॥ ५ ॥ (भीष्म. उपसं. ६) श्रीरामगुरुपदाव्जी सुकृतिरुचि मयूर खकृति हे वाहे । श्रीतुलसीसी पावुनि बहुमान न कां करील हेवा हे. ॥ ६ ॥ (शांति. ७.१२४) वदले साधु मयूरा शुकसम गमसी बरा शिशो! भावें ॥ ७ ॥ (अनु. ६-९४) रामसुतमयूर ह्मणे जाणेल निका मनी चमत्कृतिला।। नुमजुनि कथे न मानिल तुज तेंवि, निकाम नीच मत्कृतिला. ॥ ८ ॥ (अनु. ७-१०७)। स्तवनी समर्चनी जरि जिव्हा हस्ते चुका, परि समोर । नाचा प्रभुच्या ह्मणती गुरु, की बहुमत शुकापरिस मोर. ॥ ९ ॥ (अश्वमेध ६-८६) धन्य श्रीराम पिता, धन्या लक्ष्मी प्रसू जगी झाली,।. आली सत्यवतीची की भारतकीर्ति सुतमुखीं आली. ॥ १० ॥ ( स्वर्गा. २-४२० ज्यांच्या गानें व्हावें प्रेमाश्रुक्षपितचंदन मयूरें। आर्या समर्पिल्या हरिचरणीं श्रीरामनंदन मयूरें ॥ ११ ॥ (स्वर्गा. २-५५) ज्यांच्या वचनी चित्तीं कर्मी सर्वत्र भाव कुशल वसे । या कृतिस तेचि गातिल सुकृती वाल्मीकिकृतिस कुशलवसे. ॥ १२ ॥ (स्वर्गा २-५७) सच्चतःकैरवातें विकच करि, जगत्ताप संपूर्ण टाळी, । अज्ञानध्वांत सारे हरि, रसिकचकोरासि अत्यंत पाळी; ॥ नानावस्तु प्रकाशी, कविहृदयपयोराशिसंतोषहेतु, काव्येंदु खप्रभेने खळविरहि जनीं होतसे धूमकेतु. ॥ १३ ॥ (प्राकृतमंत्ररा. उपसंहार का विशुद्ध स्वांताला रुचति गुण पीयूषसम जे,। परी त्यातें दुष्ट स्वमनिं विष ऐसेंचि समजे;॥ घृतें क्षीरें होतीं प्रमुदित मखीं निर्जर खरे, परी तेही तापप्रदरस जयाला ज्वर भरे. ॥ १४ ॥ (मंत्र. उपसं. ९)