Jump to content

पान:केकावलि.djvu/334

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट-उ. . रसिकत्वाविषयी मोरोपंताचे उल्लेख. स्त्रीरत्नी वहु रमला नृप, सरसी रसिक काय तो कवनी. ॥ १॥ (आदि. अ० १० गी० ८०) सत्कृतिशी रसिकाची तुजशी माझी तशीच गांठ पडो. ॥ २ ॥ (आदि. १२.३७) अवनीं तुमच्या मज में रसिकांच्याहि रसिका सुख न कवनी. ॥३॥ (आदि०अ०२८ गी०४९) संधानशक्ति माझी कांपवि तत्हृदय, जैवि शिर कविता. ॥ ४ ॥ (उद्योग० १३.७७) रसिककवि परमसज्जन भगवद्भक्त प्रसन्न होतील न गमेल यापरिस हित तो जो वदनांत अमृत ओतील. ॥ ५॥ (भीष्मपर्व उपसंहार ४) खंडन करी प्रतिपदी कटकी दोषज्ञ जेंवि दुष्कवनी. ॥ ६ ॥ (द्रोण.११.२८) ती त्याचे कांपवि, जसि आणुनि नेत्रांसि तोय शिर कविता. ॥ ७ ॥ (द्रोणपर्व १७.७) ती कांपवी तयाचें, रसिकांचे जेंवि काय शिर कविता. ॥ ८ ॥ (कर्ण. ४७.४६) सविता बिसनीसि वरी, की भेटे तो गुणज्ञ ती कविता. ॥ ९ ॥ (कृष्णविजय ८६.२७) रस न समजती, ह्मणविति रसिक ह्मणुनि चित्त बहुत हळहळतें, जें तनिंदक भाषण होतें कर्णात तप्त हळहळ तें. ॥ १० ॥ (रामरीति ६०) थोरांहीं स्तविले कवि, तनिंदा तिळहि सोसवत नाहीं,। मज सुरसग्रंथांहीं, वृत्ति परा जेवि सोस वतनाही. ॥ ११ ॥ (रामरीति ६१) - झाली जीर्ण तरि मनी आहे रसिकांत भर वसायाचा. ॥ १२ ॥ (रामरीति ६७) साधुप्रसाद, आर्यामृतरस रसिकां सख्यांसि दाखवितो. ॥ १३ ॥ (नामसुधाचषक ११७) भेटो रसिक, लवहि जो ग्रंथी चषकांत नूरवि प्राशी । ऐसा वर दे वरदेश्वरचरणा ! मज मयूरविप्राशी. ॥ १४ ॥ (नामसुधाचषक १२०) उघडा करितां होइल दूषकखळदृष्टिमक्षिकापात, । रसिकांसि शोधितों मी, तो चषकावरि असो तुझा हात. ॥ १५ ॥ (नामसुधा. १२१) कंठीं धरूनि व्हावें सत्कृतिला पात्र सज्जनीं रसिकी. ॥ १६ ॥ (प्रश्नोत्तररत्नमाला उपसंहार) ज्वरितासि शर्करा जसि, कटु होय खळासि सुरसही कविता. ॥ १७ ॥ (प्रश्नो. उपसं. ५) सेवावें रसिकें वच याचे श्रीराघवें जसें बदर. ॥ १८ ॥ (सन्मनोरथ. २५) बोलूनि डोलवू हा डोलवितों जेंवि रसिक शिर कीर, । मग चिंता काय जडा वाटो याची सदैव किरकीर. ॥ १९ ॥ (सन्मनो. २७) देतो सत्संग जना अमृतकराहून शुद्ध सद्यश तें। जे गावें सत्कार्वनी रसिकसभेमाजि गद्यपद्यशतें. ॥ २० ॥ (सत्संगस्तव १४) भेटे दशार्णपति, बहु वर्षे प्रेमाश्रु, रसिक सत्कृतितें । तेंवि दृढ धरी हृदयी माहिषीतें करि यथार्थ सत्कृति तें. ॥ २१ ॥ (ब्रह्मोत्तरखंड) भक्त मयूरकरें हे श्रीगुरुने लिहिविलें सभापर्व, । की आर्यानंदांचे रसिकांची नित्य हो सभा पर्व. ॥ २२॥ (सभा ७-९२)