Jump to content

पान:केकावलि.djvu/333

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट-ई. आर्याछंदस्तुति. छंदःशास्त्रीं आद्या, सन्मान्या जसि सतीगणी आर्या । आर्या हे सद्रसिका जैवि शिवा ती तसी प्रिया आर्या. ॥ १॥ (स्वर्गा २. ५२) शुढे अचंचळ मनें अवलोकाव्या वुधे जशा आर्या । निःशेषपापतापव्यापत्प्रशमार्थ या तशा आर्या. ॥ २ ॥ (२. ५४) ज्यांच्या गानें व्हावें प्रेमाश्रुक्षपितचंदन मयूरें। आर्या समर्पिल्या हरिचरणीं श्रीरामनंदन मयूरें. ॥३॥ ( २. ५५) बहुमानीलचि पूर्व प्रेमातें न त्यजूनि ओव्याही । आर्यासि ह्मणेल रसिक अभिनव विहिणींस जेंवि 'ओ'व्याही.॥ ४ ॥ (२. ५६) आर्या आयांसि रुचे हीच्या ठायीं असे जशी गोडी। आहे इतरा छंदी गोडी परि यापरीस ती थोडी. ॥ ५ ॥ (भीष्मभक्ति. १०) प्रकटी प्रथम भगीरथ नृप लोकी सुरनदीस ती आर्या । तसि हे मयूर नाहीं तरि सर्वांला न दीसती आर्या. ॥६॥(नामसुधाचषक १११) उचित प्रचार भासो रसिकांस प्राकृतांत आयांचा । युष्मद्वरेंचि होतो सत्कार प्राकृतांत आयांचा. ॥ ७ ॥ (११२) गयें ओव्या सवया दोह्यातें सर्व जाणती लोक । श्लोक प्रिय ज्यांस जया प्रसन्न तूं पुण्यपूर्वकश्लोक. ॥ ८ ॥ (११३) आर्यानाथा ! आधी छंदःशास्त्रांत पिंगळाचार्या । • आर्याराध्या देवा ! त्वांचि पढविली मनोहरा आर्या. ॥ ९ ॥ (११४) आर्यासुधा वुधांनी आकंठ प्राशिलीच धन्यांनीं। कानी मात्र परिशिली होती हो ती सती तदन्यांनी. ॥ १० ॥ (११५) ते हे सुधा बुधांनी मज लुब्धाला दिली सदा त्यांनीं। केलों पात्र दयेला आधी, मग मी किलीस दात्यांनी. ॥ ११ ॥ (११६) सुखद प्रचार रसिकां वाटेल प्राकृतांत आर्याचा । तुमच्या वरेंचि जैवि व्रजवासि प्राकृतांत आर्याचा. ॥ १२ ॥ (११८) आर्यावृत्तक्षीरी युष्मनुतिशुद्धशर्करा प्राज्य ।। वरि ओतिले यथेच्छ स्वच्छ श्रीरामनाम भव्याज्य. ॥ १३ ॥ (११९) तसेंच भीष्मपर्व ('पुरुषा आर्यावृत्ते इ.) अ० १२ गी० ७९; कृष्णविजय अ० १ गा. ५, ६ (वृत्ती आधी आर्या श्राव्या...५; ह्मणति भलीला आर्या...६) पहा.