Jump to content

पान:केकावलि.djvu/327

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०) मोरेश्वरपदपद्मा चोविस आर्यामयें कुसुमदामें । पूजियले नतिपूर्वक भावें बडवोपनामकें रामें. ॥ २४ ॥ ( काव्येतिहाससंग्रह-अनेककविकृत कविता भाग २ रा, पृ० २०३-२०५). ६ सुप्रसिद्ध महाराष्ट्रपंडित व मयूरभक्त परशुराम तात्या गोडबोलेकृत. घाली प्रभुच्या कंठी सन्मणिमाला रचोनि जो भावें । तेणेही त्या सत्तममाळंतचि तत्समान शोभावें ॥ १ ॥ ७ कोल्हापुरस्थ लक्ष्मीपूजक दाजि मुनीश्वरकृत. कविता मयूरकवीची, तीस मना ! सुरभि मान, वाचा वी। तीच सतत, निरसाया कविहीं निजदुरभिमान वाचावी. ॥१॥ म्यां श्रीमयूरकविपरि न परिसिला सकल कवि महीवरता;। साजेना कां तैशा त्या कविला सकलकविमहीवरता. ॥२॥ श्रीमन्मयूरकविच्या होय जसें सुख रसिकजनां कवनीं । विबुधेश्वरासहि तसें ऐकुनि न निनद पिकज नाकवनी. ॥ ३ ॥ ( काव्यसंग्रह, उद्योगपर्व पृ० ३३३, टीप.)