पान:केकावलि.djvu/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२७) अर्थाचे मंडन कधी कधीं जें ग्राम्य दृष्टांतांनी केलेले आढळतें तें बहुशः लांब किंवा ठरीव यमक साधण्याकरितां ह्मणून असते. याचे एकच उदाहरण: तो प्रळयकाळघनसा लागे सर्वत्र शक वाढाया,। - सुर ह्मणति फुटाण्यापरि याच्या नग रगडतील दाढा या. ॥ (हरि.४८.११२). यांतील पूर्वार्धातील उपमा मोठी भारदस्त असून खालची फुटाण्याची उपमा ग्राम्य व नीरस होय. असल्या दाखल्यांनी वाचकांच्या मनाचा विरस होतो. त्यांच्या काव्यांतून क्वचित सत्काव्यांत न शोभणारे असे हलके शब्द व अप्रौढ भाषापद्धति आढळून येते हा तिसरा दोष. थान, (कानांतला) फोड, मिशांवर ताव देणे, नाकास चुना लावणे हे शब्द व वाक्यांश याची उदाहरणे होत. मोरोपंतांचे काव्य जरी अगदी सोवळ्यांतलें सोंवळे आहे तरी पण क्वचित् अश्लीलशब्दयोजना, फाजील शंगारिक उपमा व फाजील शंगारिक वर्णनहीं त्यांत आढळतें. साधुरीति गी. १८,२६, केका. ७,२४ (तसेच पृ.६७-६८तील उदाहरणे पहा.) ही ह्यांची उदाहरणे होत. हा चवथा दोष. आणखी 'कालविपर्यास' ह्मणून एक पांचवा दोष पंतांच्या काव्यांत क्वचित् आढळतो. ज्या काळाला जें वर्णन योग्य नाही त्या काळी तें वर्णन केले असतां हा दोष उत्पन्न होतो. गोपीगोडवा गी. ६१, राधाकृष्णसवाद गी.१५, कुशलवो. ३.१६ ही याची उदाहरणे होत. गोपीगोडव्यांत गोपी कृष्णाविषयीं ह्मणतात: हरियशचि वजहृदया धाम, जसें तोय धाम यादासी;। भजुनि हरिजनां पावो हरिला, ती जेवि नामया दासि ।। (६१) यांत नामदेवाच्या जनीदासीचा उल्लेख केला आहे तो त्या कालीं अयोग्य ह्मणून हा कालविपर्यास दोष झाला. आणखीही बारिकसारिक दोष मार्मिक वाचकांस सांपडतील; पण त्यांची व्याप्ति अत्यल्प अशीच आढळून येईल. मोरोपंतांच्या एकंदर अवाढव्य काव्यरचनेच्या मानाने हे सर्व दोष अत्यल्प असून त्यांतील गुणांचे पारडे अत्यंत जड भरत असल्यामुळे ते दोष त्यांना कमीपणा आणत नसून उलट गालबोटाप्रमाणे त्यांच्या काव्यांस शोभाच देतात. . ९ मोरोपंतांची इतर कांहीं कवींशी संक्षिप्त तुलना. 'सुश्लोक वामनाचा,अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची। ओवी मुक्तेशाची,किंवा आर्या मयूरपंताची ___(अ) कालिदास व मोरोपंत:-कालिदास व मोरोपंत या दोघांनीही आपली काव्य इतिहासपुराणाधार लिहिली. लोकस्थिति, वनशोभा, ऋतुवर्णन, स्वयंवरें इत्यादि गोष्टींसंबं. धाने स्वतंत्र, विस्तृत व सुरस वर्णन जसें कालिदासाच्या कवितेत वाचावयास मिळते तसे पंतांच्या काव्यांत मिळत नाही. त्यांचे लक्ष्य विस्तारपूर्वक वर्णनाकडे फारसें दिसून येत नाही बहुतेक वर्णनसंक्षेपाकडेच त्यांचा कल दिसतो. तरी प्रसंगविशेषीं पंतांनी मूळ ग्रंथाहन भिन्न असेंही वर्णन-मग तें फारसें विस्तृत कां नसेना-केलेले आढळते. भारत, भागवत, हरिवंश, मंत्ररामायण ह्या ग्रंथांत बऱ्याच स्थळी ज्याला मूळ ग्रंथांत बिलकुल आधार नाही किंवा फारच थोडा आहे, असें वर्णन पंतांनी क्वचित् विस्तृतपूर्वकही केले आहे. भागवतात रुक्मिणीने आपले स्वयंवरवृत्त द्रौपदीस एका श्लोकांत सांगितले असून पंतांनी त्याचा ९२