पान:केकावलि.djvu/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८४ मोरोपंतकृत स्मरे घेडिघडि, प्रभो! भवपयोधिच्या पारदा! ॥ तुझें यशचि तारितें, परि न केवळा तारवे; __ संहाय असिला असे, तरिच शत्रुला मारवे । ११५ असून आतां ब्रह्ममानसपुत्र झालों हे सर्व भगवत्कृपेचें माहात्म्य असें नारदाच्या मनांत वारंवार येऊन तो तुमचे यश वर्णित गात नाचत असतो. भगवंतांनी केलेले उपकार नारद विसरला नाही. .. १. घटकोघटकी, वारंवार, पुनः पुनः. २. भव-संसार+पयोधि-सागर, त्याच्या; संसारसमुद्राच्या. संसाराला सागराची उपमा देणे हे कविजनाला अत्यंत संमत आहे. ही उपमा विस्तारास्तव, ती तरून जातांना लागणाऱ्या संकटांस्तव, व अगाधत्वास्तव फार सरस होय. ३. पार दाखविणाऱ्या! संसारसमुद्राच्या पैलतीरी नेणाऱ्या ! ईश्वर हा संसारसागर सुखरूप तरून जाण्यास उत्तम वाटाड्या होय. ठरीव यमकः-'पारदा' व 'नारदा' हे पंतांचे आवडते व ठरीव यमक होय. याची उदाहरणे त्यांच्या काव्यांतून पुष्कळ आढळतात. [केका ११२ पहा, कृष्णविजय-उत्तरार्ध-अ० ५५ श्लो० ३८ पृ० ३७.] ४. प्रास्ताविकः-नारद ब्रह्मपुत्र झाला, तसेंच तो संसारसमुद्रांत तरला याचे कारण त्याला साधूंच्या मुखाने भगवत्कथा श्रवण करण्यास सांपडली यावरून कवि यांत सत्संगतिमाहात्म्य वर्णितात. अन्वयार्थः-[देवा!] तुझें (तुमचे भगवंताचें) यशचि (कीर्तिच), तारित प्रथिने) परि (परंतु) केवळा (नुसत्या त्या ययालाच), न.तारवे (तारवती हीं;). असिला (खड्गाली) सहार्य (पाठबळ) असे (असेल), तरिच शत्रुला मारवे (मारत); अज्ञहृदयें (मूर्खाची अंतःकरणे) भागवत (भगवद्भक्त) न भेटतां (भेटला नाही तर), सत्संगति (साधुसमागम) न घडतां (घडला नाही तर) तव (तुझ्या) यशोरसीं (यशरूप रसांत, यशोवर्णनांत) तशी (त्या प्रकारची, साधुसंगतीने रंगतात तशी) न रंगति (रंगत नाहीत, तल्लीन होऊन जात नाहीत). प्रथमचरणार्थः-देवा! तुमच्या गुणानुवादकीर्तनाने प्राणी तरतात हे तर खरेच; पण नुसत्या असाहाय गुणानुवाद गाण्यानेच ते तरत नाहीत. त्याला दुसन्याचे म्हणजे सत्समागमाचे साहाय लागते. भगवद्गुणकीर्तनानेच प्राणी तापत्रयापासून मुक्त होत नसून तसे होण्यास त्याला सत्संगतीचें साह्य लागते. याला दृष्टांत खगाचा. ५. पाठबळ; त्या तरवारीची मठ धरणारा कुशल शूरादिसहाय. द्वितीयचरणार्थः-तरवार कितीही पाणीदार असली तरी तिला धरणारा कुशल असेल तरच तिच्याने शत्रूचा नाश होईल. नुसती तरवार काय कामाची? ती आपण होऊन थोडीच शत्रूच्या मानेवर जाऊन प्राण आहे? त्याचप्रमाणे भगवत्कीर्ति जरी पापांचे डोंगर भस्म करिते, तरी त्याविषयी कोणी तरी सदुपदेशक लागतो. व्यंग्यार्थः-भगवत्कथाकीर्तनाची मनःपूर्वक आवड बाळगणाऱ्या भक्तास पुढे मार्ग दाखविणारा सद्गुरु भेटतो.