________________
केकावलि. २८३ तुझें चरित सन्मुखें श्रवण जाहलें, यास्तव प्रजापतिसुतत्व ये करिति साधु ज्याचा स्तवः । स्वनीचपण मागिलें, बहु दँया अशी नारदा 283 ब्रह्मवीणा, महती. नारदाच्या वीणेला महती असें नांव आहे. 'विश्वावसोस्तु बृहती तुंबरोस्तु कलावती । महती नारदस्य स्यात्सरस्वत्यास्तु कच्छपी ॥' [वैजयंती-शिशुपालवध-स०१ श्लो०११] 'शिवस्य वीणा नालंबी गणानां तु प्रभावती'। हेमचंद्रकोश-रघुवंश-सर्ग ८ श्लोक ३५ टीका]. ५. देहभान विसरून प्रेमाने नृत्य करितो. समानार्थकः-'नारद वैष्णवशिरोमणी। नाचे कीर्तनीं सर्वदा॥१॥ देवचि त्याची पूजा करी। आणि नमस्कारी भेटतां ॥ २ ॥ दैत्या घरी वहुमान त्याचा । ऐसा कीर्तनाचा बडिवार ॥ ३॥ निळा ह्मणे तिहीं लोकांत । कीर्तनें विख्यात हरिभक्त'. ॥ ४ ॥ १. प्रास्ताविकः-नारदाला कथाकीर्तनाची अत्यंत गोडी लागण्यास तरी कारण भगवत्प्रसादच झाला असें या केकेंत कवि सांगतात. तुझें भगवंताचें. २. चरित्र, कथा. ३. साधूंच्या मुखाने. अन्वयार्थः-[नारदाला] तुझें चरित (भगवंताचें चरित्र, भगवत्कथा) सन्मुखें (साधूंच्या रसाळवाणीने) श्रवण जाहलें (ऐकण्यांत आले, ऐकिलें); यास्तव (म्हणून) प्रजापतिसुतत्व (ब्रह्मदेवाचें पुत्रत्व) ये (आलें, प्राप्त झाले); ज्याचा (ज्या नारदाचा) स्तव (स्तुति, प्रशंसा) साधु (संत, भगवद्भक्त (नति (करूं लागले. करितात): [हे!] भवपयोधिच्या (भवसागरच्या) प्रारटा! - (परे दगा या; पार नेणाऱ्या) प्रभो! (देवा!) मागिलें (पूर्वजन्मोच) स्वनीचपण (आपलें नीचयातित्व) [व] बहु दया (भगवंतांनी दर्शन देऊन आपल्यावर केलेली कृपा) अशी नारदा (नारदाला) घडिघडि (घटकोघटकी, वारंवार) स्मरे (स्मरत असते). ४. प्रजेचा पति (स्वामी) ब्रह्मदेव त्याचे सुतत्व (पुत्रत्व), ब्रह्मदेवाचे मलसपुत्रत्व.. ५. ज्या नारदाचा. ६. आपलें (मागील जन्मींचें) नीचपण, हीनकुलत्व. प्रथमार्धाचा अर्थ:-ज्या देवर्षि नारदाची उत्कृष्ट भगवद्भक्तीबद्दल संतजन स्तुति करितात तो नारद पूर्वजन्मी दासीपुत्र असून साधूंच्या मुखाने भगवत्कथाश्रवण घडले म्हणून प्रस्तुत कल्पी ब्रह्ममानसपुत्र झाला. नारदः-दत्तदयोदयांत पंत नारदाविषयी मा. तात:-'कंटाळे मायहि बहु हरितां शिशुचाहि बाह्य मळ हातें; । बाह्यांतर नतमळ तो गुरुवर हरि, करि शिवार्थ कलहाते. ॥ ५७ ॥ भवकारागृहमुक्त प्राणी करितो, हठेचि हरिताप । बाप ! प्रेम खरें तें बद्धविमोक्षीं सुखेंचि वरि शाप'. ॥ ६० ॥ 'नारदाभ्युदय' नावाचे पंतांचें एक - स्वतंत्र प्रकरण आहे. त्यांत पूर्वजन्मीं नारद दासीपुत्र असून पुढे साधुमुखांतून भगवत्कया श्रवण केल्याने ब्रह्मपुत्र कसा झाला याचे सविस्तर व चटकदार वर्णन दिले आहे. नारदाभ्युदय-गी० २-४२.] ७. पूर्वजन्मींचें; पूर्वकल्पी नारदाला दासीपुत्रजन्म प्राप्त झाला होता त्या जन्मींचें. ८. कृपा; भगवंतांनी दर्शन देऊन आपणावर केलेली कपा द्वितीयार्धाचा अर्थः-हे संसारसागराच्या पार नेणाऱ्या देवा! आपण पूर्वी दासीपुत्र