Jump to content

पान:केकावलि.djvu/282

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि, २७५ तुझ्याचि वचनें म्हणे तुज 'कथावश' स्वामिया ! । जसा स्थिर कथेत तूं , स्थिर करी तसें या मना; १. कथेच्या स्वाधीन. देवाला प्रेमळ कथा फार आवडतेः-(१) 'देवासि तो मुख्य कीर्तनाची गोडी । म्हणोनियां उडी घाली स्वयें ॥१॥ नावडत तया आणिक संकल्प । कीर्तनी विकल्प करितां क्षोभे. ॥२॥ साबडे भाळे भाळे नाचताति रंगीं । प्रेम येते अंगीं देवाचिया. ॥३॥ एका जनार्दनीं धांवे लवलाहे । न तो कांहीं पाहे आपणातें.' ॥४॥ (२) 'कीर्तनाची आवड मोठी ! प्रेमें देव घाली मिठी.॥१॥ कीर्तनप्रिय मैं गोविंद । आदरें पूजितो नारद. ॥२॥ कीर्तन करितां अभेद। आदरें रक्षिला प्रल्हाद. ॥३॥ गजेंद्र करी नामस्मरण । धांवण्या धांवे नारायण ॥४॥एका जनार्दनी कळवळा । भक्तालागी देव भोळा.' ॥५॥ अर्थात् देवाला आवडणारी कथा सप्रेम पाहिजे. नाहीतर (तुकोबा म्हणतात:-) (३) 'प्रेमाविण जें जें केलें । निरर्थक वायां गेलें. ॥ १॥ मुखें करितो कीर्तन । मनीं विषयाचे ध्यान. ॥ २ ॥ केव्हां सरेल हे कथा । चित्त ठेविलें मन्मथा. ॥ ३ ॥ ऐसें श्रवण कीर्तन । गेले ओहोळी वाहोन. ॥ ४ ॥ तुका म्हणे पांडुरंग । जाणतसे अंतरंग.' ॥ ॥५॥ प्रेमळ कथा कशी असावी त्याविषयी तुकोबा सांगतात:- (४) 'सत्वाचे शरीर भावाचें कीतन । प्रेम जनार्दन उभा तेथे. ॥ १ ॥ अहिंसा मृदंग अद्वैताची टाळी । प्रेमाची आरोळी हरिनामें. ॥ २ ॥ सप्रेमाचा वीणा निःसंगाच्या तारा । आणिला दरारा पातकांसी. ॥ ३ ॥ जगत्रयजीवन योगियांचा राणा । ध्यानी मनी आणा तुका म्हणे.' ॥ ४॥ २. निश्चल. तृतीयचरणार्थः-देवा! आपण जसे कथेत स्थिर असतां तद्वत् या मनाला तुम्ही स्थिर करा. तुम्ही जसे कथा सोडून दुसरीकडे कोठे जात नाही, त्याप्रमाणेच माझ्या चंचल मनाला तुम्ही भगवत्कथेत निश्चल करा. 'मनास निश्चल करा' है मागणे फार मोठे आहे. मनाची स्थिरताः-मनाला स्थिर करणे हे दुःसाध्य कर्म आहे. भगवद्गीतेत अर्जुनाने म्हटले आहे:-'की कृष्णा ! चंचळ मन इंद्रियें जें मथी बळी । त्याचा निग्रह वाऱ्याची मोट जैशी न बांधवे.' ॥६.३४॥ (वामनी समश्लोकी.) योगवाशिरांत म्हटले आहे:-'अप्यब्धिपानान्महतः सुमेरून्मूलनादपि । अपि वन्शनात्साधो ! दुर्लभश्चित्तनिग्रहः ॥ म्हणूनच तुकोबा सांगतात:-'आधीं मन घेई हातीं । तोचि गणराजा गणपति. ॥१॥ मन इंद्रियांचा राजा । त्याची सर्वभावे पूजा. ॥ २ ॥ मन जीवाचा प्रधान । मन माझा नारायण, ॥ ३ ॥ तुका म्हणे मन चंचळ । हातीं येइल गुरुच्या बळे.' ॥ ४ ॥ मन स्थिर करना लाविलें म्हणजे ब्रह्मप्राप्ति होते. कारण विवेकवैराग्यादिसाधनचतुष्टयसंपन्नपुरुषाने ॐकार ह्या धनुष्याला जर मनाचा बाण लाविला व त्याने तो ब्रह्मनिशाणावर रोखून नेमका सोडला म्हणजे तो ब्रह्मनिशाणावर अचुक जाऊन लागतो व अर्थातच मन ब्रह्ममय होते असें श्रुतीत सांगितले आहे. सारांश ह्या संकल्पविकल्पात्मक मनाचा सर्व विकार काढून ते स्वरूपाचे ठिकाणी स्थिर केले म्हणजे प्राणी कृतार्थ होतो. 'मनमों गंगा मनमों काशी मनमों स्नान करे । हमारो तीरथ कौन करे ? असें संत कबीर म्हणूनच म्हणतात. कीर्तनाविषयीं पंतांचे प्रेमः-भगवत्कथाकीर्तनाविषयी आपल्याला अत्यंत आसक्ति असावी असा वर पंतांनी पुष्कळ ठिकाणी मोठ्या आवडीने देवापाशी मागितला आहे. 'सन्मनोरथराजी'तल्या अशा पुष्कळ गीतींपैकी पुढील थोड्याच गीती पहा