पान:केकावलि.djvu/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७४ मोरोपंतकृत सुरर्षिजवळी स्वयें वैदसि, 'तेत्र तिष्ठामि; यो १. प्रास्ताविकः-माझी कथा मला स्थिर करित्ये असें जें मागल्या केकेंत भगवंतांनी नारदास सांगितले म्हणून वर्णिले आहे त्याचे येथे स्पष्टीकरण करीत होत्साते कवि म्हणतात. देवर्षि नारदाजवळ. ऋषींचे वर्ग:-ऋषींचे सुर्षि (देवर्षि), राजर्षि आणि ब्रह्मर्षि असे तीन प्रकार आहेत. देवर्षि, ब्रह्मर्षि आणि राजर्षि ह्या ऋषींच्या तीन प्रकारांशिवाय महर्षि, परमर्षि, श्रुतर्षि आणि कांडर्षि असे चार प्रकार आणखी कोणी मानतात. तेव्हां ऋषींचे एकंदर सात प्रकार होतात. भगवन्निष्ठ असून अध्यात्मविषयाची चर्चा करणान्या जनकासारख्या क्षत्रियांस राजर्षि म्हणतात. परमार्थविषयाची अहोरात्र चर्चा करणाऱ्या ब्राह्मणांस ब्रह्मर्षि म्हणतात. उदाहरणार्थ:-वशिष्ठवामदेवविश्वामित्रादि. ज्यांचा अधिकार मोठा असून ज्यांचे स्वर्गलोकी गमन आहे अशा ब्रह्मनिष्ठांस सुरर्षि (देवर्षि) म्हणतात. नारद, अत्रि, भरद्वाज, मरीचि इत्यादिक सुरर्षि होत. २. स्वतः. अन्वयार्थः-सुरर्षिजवळी (नारदाजवळ) स्वयें (स्वतः, खुद्द) वदसि (म्हणालास) 'तत्र (तेथे) तिष्ठामि (उभा राहतों);' स्वामिया ! (प्रभो!) या (ह्या) तुझ्याचि वचने (तुझ्या स्वतःच्या वचनावरून)[मी] तुज (तुला) कथावश (कथेनें वश केलेला) म्हणे (म्हणतों); जसा तूं (प्रभु) कथेत स्थिर (निश्चल)[असतोस] तसें या मना (कवीच्या मनाला)[कथेत] स्थिर करी (कर); स्वभक्तसुरपादपा! (भक्ताला देवतरूप्रमाणे इच्छिले देणाऱ्या प्रभो!) हे (ही) [माझी कामना सफल (फलयुक्त) असो. प्रथमचरणार्थः-देवा! तुम्ही स्वतः नारदाजवळ-'मी तेथे उभा राहतों'-असें म्हणालांत. भगवंतानें नारदास 'नाहं वसामि वैकुंठे, योगिनां हृदये, रवौ, । मद्भक्ता यत्र गायंति, तत्र तिष्ठामि नारद !' मी वैकुंठांत राहत नाहीं, योग्यांच्या हृदयांत वसत नाहीं, सूर्यमंडळांतही राहत नाही, तर जेथे माझे भक्त मद्गुणानुवाद वर्णन करितात त्या ठिकाणी मी उभा असतों, असें म्हटले आहे. यावरून 'तत्र तिष्ठामि' हे दोन शब्द भगवंताच्या वरील भाषणांतून घेतले आहेत असे स्पष्ट दिसून येईल म्हणून 'तत्र तिष्ठामि' तेथे उभा राहतों याचा अर्थ जेथे माझे भक्त मला सप्रेमांतःकरणाने गातात तेथे उभा राहतों असा होतो. ३. पाठभेदः-याबद्दल 'म्हणसि' असाहि पाठ आढळतो. ४. तत्र तिष्ठामि तेथे उभा राहतो. जेथें भगवजन माझे गुणानुवाद गातात त्या ठिकाणी मी उभा राहतो. समानार्थक उतारेः-तुकोबाचाहि याच अर्थाचा. एक अभंग आहे:-'माझे भक्त गाती जेथें । नारदा ! मी उभा तेथें.' ॥ यासंबंधानें 'पांडुरंगदंडकांतील पुढील गीती वाचाव्याः-'निश्चळ उभा निरंतर विठ्ठल निजनामगजर परिसायाः । मग तो स्वनामकीर्तननिरत सखा; जो तदन्य अरिसा या. ॥ १३. ॥ भक्तयशस्वयशातें गात्याच्या ठाकतो पुढे मागे; । डोलतसे परमसुखें; डोलावें सुस्वरें जसें नागें. ॥ १४ ॥ भीमरथीच्या तीरी, किंवा भाविककथेत वाळवटीं । तो निर खिला जनें, जो मार्कंडेये मनोज्ञ बाळ वटी. ॥ १७॥ में प्रेमळकृतकीर्तन, रुचतें या प्रभुसि आठ यामहि तें । म्हणतो, सज्जन तारिति हे करुनि अभंग पाठ या महितें. ॥ १८ ॥' [पांडुरंगदंडक-मो. स्फुट, भाग १ पृ० १३३]. ५. ह्या. द्वितीयचरणार्थः-तुम्हीं नारदाला सांगितले त्याच्याच आधारावर मी तुम्ही कथेच्या आधीन आहां असें तुम्हांला म्हणतों..