Jump to content

पान:केकावलि.djvu/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४८ मोरोपंतकृत समजण्यास थोडे तरी साह्य होईल. 'नारदस्तु तदर्पिताखिलाचारता तद्विस्मरणे परमव्याकुलतेति' (भगवंताला सर्व कर्मे अर्पण करणे व त्याचे क्षणभर विस्मरण झाले तरी परमव्याकुलता प्राप्त होणे याला भक्ति ह्मणावें) अशी भक्तवर्य मुकुटमणी नारदाची भक्तीची व्याख्या आहे. या भक्तीचे उदाहरण त्यांनी 'यथा ब्रजगोपिकानाम्' (गोकुळांतील गोपिकांस अशा प्रकारची भक्ति घडली) असे दिले आहे. यावरून गोपिकांनी प्रभूची उत्कट भक्ति केली हे सुव्यक्त होते. आतां भक्तीचे मुख्य दोन भेद. गौणी आणि परा. आपलाच देव खरा, दुसरे देव खोटे, आपलाच आचार किंवा धर्म चांगला, दुसऱ्याचे आचार व धर्म खोटे, अशा प्रकारची भावना बनी परमेश्वराची भक्ति होते ती गौणी. सर्वत्र परमेश्वरसत्ता आहे, अशी भावना घडल्यामुळे जेव्हां दसऱ्या कोणत्याही आचाराचा किंवा धर्माचा द्वेष न करितां सर्वत्र समबुद्धि ठेवून ईश्वरभक्ति करितो तेव्हां ती भक्ति परा (श्रेष्ठा) समजावी. याचे शांत, दास्य, वत्सल, सख्य व मधुर असे एकापेक्षा एक वरचढ पांच प्रकार आहेत. सर्व वृक्ति शांत ठेवून जी परमेश्वराची भक्ति करावयाची ती शांत' भक्ति. ऋषि बहुधा 'शांत' भत्ति करीत. देव स्वामी व भक्त सेवक अशी भावना करून जी भक्ति करावयाची ती 'दास्य' भक्ति. रामभक्त मारुतीने दास्यभक्तिच केली. र हा आपला पुत्र व आपण त्याची माता असे समजून जी प्रेमळ भक्ति करावयाची तिचे नांव कमल भक्ति. कौसल्या व देवकी हे जन्म घेऊन अदितीने 'वत्सल' भक्ति केली. ईश्वराला आपला जिवलग मित्र समजून त्याला आपली सर्व सुखदुःखें कळविणे ही 'सख्य' भक्ति. अर्जुन व यांनी सख्य' भक्ति साधिली. जगांतील स्त्रीपुरुष हे सर्व स्त्रीरूप व परमेश्वर मात्र एकटा पण अशी भावना धरून ह्या जगांतील स्त्रिया पुरुषांवर व पुरुष स्त्रियांवर में प्रेम करितात तें सर्व परमेश्वरार्पण करावयाचे याचे नांव 'मधुर' भक्ति. या भक्तीच्या प्रकारांत भक्त परमेश्वरास पति व स्वतःस पली समजून त्याजवर अनन्यसाधारण भक्ति करितो. रुक्मिणीचे श्रीकृष्णावरील प्रेम हे ह्या सदरांत येते. या मधुर भक्तींतही दोन प्रकार आहेत. देवाला पति व स्वतःस पत्नी मानन जी भक्ति करावयाची हा एक प्रकार. याच्यावरील प्रकार ह्मणला ह्मणजे वाला प्रियकर मानून पिता, बंधु, पति हे सर्व नको नको झणत असतां त्याजवर जें अत्यंत प्रेम करावयाचे तो होय. या प्रकारात काही जणांना वाटते त्याप्रमाणे अमंगलव नसतो अत्यंत परमावधि होते. जारजारिणीच्या प्रेमांतील वैषयिकपणा यांत मुळीच नसन त्यांतील अमर्याद प्रेम मात्र हजारपटीने यांत वाढलेले असते. राधाकृष्णाची भक्ति या 'मधुर' भक्तीच्या वरच्या प्रकारांत येते. त्या भक्तीला वैषयिक प्रेम समजणे हे अत्यंत असमंजस होगा 'संतमकुटमणी' तुकाराम ह्यांच्या 'विरहिणी' (विराण्या)च्या अभंगांत 'मधर भक्तीचा हाच प्रकार वर्णिला आहे. रसज्ञांनी ते अभंग अवश्य वाचावेत. कृष्ण विषयी नव्हता याविषयी एकनाथी भागवतांतील पुढील संक्षिप्त उतारे वाचनीय आहेतः-(१) ज्या बाणाचामा लागतांचि पै भेदरा । तापसी घेतला पुरा । सोडोनि घरदारां पळाले २२७ ॥ तैसे सोळा सहस्र बाण । अखंड तुजवरी अनुसंधान । करितां न मळे बोध जाण । अतिविंदान हे तुझें २२८॥ घरींच्या स्त्रिया सहस्र सोळा । गोकुळादि मथुरेच्या अबला । तुज विषयी करावया गोपाळा । नव्हती सकळा समर्था २२९ ॥ त्यांचेनि तुज न करवेचि विषयी। परि त्या त्वां केल्या निर्वि