________________
केकावलि. २४७ नित्य सहवास घडावा म्हणून वेदांनीही गोपिकांची रूपे घेतली. अशा प्रकारे वेद, देवांगना, दंडकवासी महर्षि, व गोलोकवासी देवता ह्या चौघांनी गोकुळांत प्रभूबरोबर क्रीडा करण्यास्तव गोपिकांचे जन्म घेतले. (याला आधार पद्मपुराण). तेव्हां ह्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्याकरिता प्रभूनें कृष्णावतारी चौर्यादि विलक्षण दिसणारी कर्मे व रासक्रीडा केली. त्यांत देवभक्तांचे अलौकिक प्रेमच भरले असून वैषयिक प्रकाराचा गंधही नाही. तसेंच रासक्रीडेसंबंधी आणखी एक गोष्ट लक्ष्यांत ठेवावी की, 'राधा इत्यादि गोपिकांना वाटत असे की, श्रीकृष्ण आझाला पति असावा. अशा रीतीनें गोपिकांचें जारभावनेने श्रीकृष्णस्वरूपाकडे मन लागले, व श्रीकृष्ण आपणांस पतीप्रमाणे कसा मिळेल? हे चिंतन गोपिकांना जागृत, स्वप्न या दोन्ही अवस्थांत लागले. हे अंतर्साक्ष भगवान् श्रीकृष्ण याला कळून श्रीकृष्णाने आपली योगमाया प्रकट करून लक्षावधी गोपिकांस एकच काळी असा चमत्कार दाखविला की, श्रीकृष्ण आपणांस पति मिळाला, आणि एकदम लक्षावधि गोपिकांजवळ लक्षावधि श्रीकृष्ण क्रीडा करूं लागले, असें गोपिकांना व इतर ऋषींना दिसले. परंतु कंसवधार्थ व भूभारहरणार्थ जो श्रीकृष्णावतार उत्पन्न झाला तो यशोदेजवळच बसला होता. तसेंच गोपिकांच्या नवऱ्यांना आपल्या स्त्रिया गोपिका यांचा एक दिवसही वियोग झाला नाही आणि गोपिकांना तर असे वाटत असे की, श्रीकृष्णावांचून आझांस दुसरा पति ठाऊकच नाही. परंतु श्रीकृष्णावताराने गोकुळांत बाळपणीं स्त्रीसंग केलाच नाही, कारण स्त्रीसंग केलेल्याचे हातून कंसास मरण नव्हते. ह्मणून श्रीकृष्ण हा बालब्रह्मचारी होता. तात्पर्य, पुराणांत लाक्षणिक भाषणांनी, ह्मणजे शृंगार, वीर, करुणा, बीभत्सादि अनेक रसांच्या योजनाप्रकारांनी बहुत ठिकाणी आत्मज्ञान कथन केले आहे. त्या लिहिण्याचा यथार्थ विचार न करितां, व लिहिण्याची पूर्वापारसंगति न पाहतां भलताच शब्दार्थ समजून श्रीकृष्णास दूषणे देतात, ते शतमूर्ख समजावे.' (वेदोक्त धर्मप्रकाश.) मंगीश कवीने 'राधाविलास' नामक काव्य रचिलें आहे. त्यांत 'आनंद' हा नंद, 'सद्बुद्धि' ही यशोदा, 'आत्मा' हा कृष्ण, 'इंद्रियें' ह्या गाई, 'शरीर' हे गोकुळ, 'इंद्रियांचे चालक देव' हे गोपाळ, 'ज्ञानवृत्ति' ह्या गोपिका, 'ज्ञान' हा वृषभान, व भक्ति' ही राधा अशा रीतीनें रूपक सोडवून पुढे आत्म्याचा व भक्तीचा विलास तोच राधाकृष्णविलास असें सविस्तर वर्णिले आहे. त्यांत राधाकृष्णविलासद्वारे कवीनें भक्तिज्ञानयोगाचे सुरस वर्णन केले आहे. वास्तविक पाहतां रासक्रीडादि श्रीकृष्णाच्या लीलांत ठिकमि काणीं गूढ आत्मज्ञान कथन केले असून त्यांत एकनिष्ठभक्तीचे अत्यंत सुरस वर्णन क र ह्मणूनच शुकाचार्यासारख्या ब्रह्मैकनिष्ठ पुरुषाने मृत्यूच्या द्वाराशी बसलेल्या व देहाचे परम सा व्हावे अशी उत्कट इच्छा करणाऱ्या महाभगवद्भक्त परीक्षिति राजाला भगवान् श्रीकृष्णाच्या परममंगल चरित्रांतील ह्या क्रीडा मोठ्या आवडीने सांगितल्या. श्रीमद्भागवताच्या सुप्रसिद्ध 'तोपणीसार' नामक टीकेंत रासक्रीडेच्या टीकेला प्रारंभ करितांनाच 'निवृत्तिपरेयं (रास) पंचाध्यायी।' (ही रासपंचाध्यायी अध्यात्मपर लावावयाची आहे.) असे स्पष्ट लिहिले आहे. रासक्रीडेंत भक्तीचे उत्कृष्ट वर्णन आहे ह्मणून वर झटले आहे. त्याचा खुलासा करण्याकरिता प्रसंगानुसार येथे स्वामी विवेकानंद यांचा 'भक्तियोग' हा उत्तम ग्रंथ व नारदाची 'भक्तिसने। यांच्या आधाराने पुढील दोन शब्द लिहिले आहेत. त्यावरून ह्या विषयाचे थोडें बहुतं स्वरूप