Jump to content

पान:केकावलि.djvu/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २४६ कथा सुपुरुषा तुझी वंश तशी करी, राधिका यिका या उपमानाचे श्रवणविषय होणे आणि चत्वरीं आविर्भूत होणे इत्यादि धर्माचा बिंबप्रतिबिंबभाव फार सुंदर रीतीने दाखविला आहे ह्मणून हा दृष्टांत अलंकार झाला.' [य० पां०-पृ० ३२७.] या अलंकाराच्या विशेष स्पष्टीकरणार्थ केका ४ पृ० १३ पहा. १. प्रास्ताविकः-भगवत्कथा सत्पुरुषांना आवडते हाच मागल्या केकेंतील अर्थ कवि यांत दृढ करितात. अन्वयार्थः- जिला (ज्या राधिकेला) तूं स्वयें (स्वतः) शरीराधिका (शरीराहून जास्त प्रिय) ह्मणसि (ह्मणत होतास, मानित होतास), [ती] राधिका (राधा) जशी [ज्याप्रमाणे तुज (भगवंताला) [वश करी] तशी तुझी कथा (भगवत्कथा) सुपुरुषा (साधु पुरुषांना) वश करी (करिते); प्रभो! रमाहृदयवल्लभा! (लक्ष्मीप्रिया! सर्वैश्वर्यसंपन्ना देवा!) तिचें (राधेचें) सेवन (हास्यविनोदादि क्रीडा करणे) न घडतां जसे तुज (सुला) तसे, [तिचें भगवत्कथेचें] [सेवन न घडतां मतिस (सत्पुरुषाच्या बुद्धीस) गेह (घर) वन (अरण्यतुल्य) भासे (भासतें). भगवंताच्या कथेचा महिमा साधुवर्य तुकाराम यांनी पुढील अभंगांत मोठ्या सरस रीतीनें वर्णिला आहे:-(१) कथा देवाचें ध्यान । कथा साधना मंडण । कथेऐसें पुण्य । आणिक नाहीं सर्वथा ॥१॥ ऐसा साच खरा भाव । कथेमाजी उभा देव ॥ ध्रु० ॥ मंत्र स्वल्प जनां । उच्चारितां वाचे मना । ह्मणतां नारायणा । क्षणे जळती महादोष ॥ २ ॥ भावें करितां कीर्तन । तरे तारी आणिक जन । भेटे नारायण । संदेह नाही ह्मणे तुका. ॥ ३ ॥ (२) कथा त्रिवेणी संगम । देव भक्त आणि नाम । तेथींचे उत्तम । चरणरज वंदितां ॥ १॥ जळति दोषांचे डोंगर । शुद्ध होती नारी नर । गाती ऐकती सादर । जे पवित्र हरिकथा ॥ ध्रु० ॥ तीर्थे तया ठाया । येती पुनीत व्हावया । पर्वकाळ पाया । तळीं बैसे वैष्णवां ॥ २ ॥ अनुपम्य हा महिमा । नाहीं द्यावया उपमा । तुका ह्मणे ब्रह्मा । नेणे वर्जू या सुखा. ॥ ३ ॥ हरिकथेचे महत्व आणखी पाहणे असल्यास केका ५९, पृ० १५७ टीप ५ पहा. २. साधुपुरुषाला. प्रथमार्धाचा अर्थः-रसिक आणि धन्य अशा महापुरुषाला भगवत्कथा तशाप्रमाणे वश करिते. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे राधेनें तुह्मांला वश केलें. ती राधिका कोणती? तर ज्या राधिकेला तुझी स्वतः आपल्या प्राणांपेक्षाही जास्त प्रिय मानित होतां. राधिका ही देवी, कृष्णमयी, श्रेष्ठदेवता, सर्वलक्ष्मीमयी, अत्यंत तेजःपुंज व श्रेष्ठ संमोहिनी होय असे एका पुराणांत वार्षिक आहे. 'देवी कृष्णमयी प्रोक्ता राधिका परदेवता । सर्वलक्ष्मीमयी सर्वकांतिः संमोहिनी परा' ॥ (बृहद्गौतमीय.) ३. स्वाधीन. ४. राधिका:-दुसऱ्या केकेंत ज्या राधा नामक वृषभानुकन्येचा कवीने उल्लेख केला आहे तीच ही. गोपीसमाजांत आठ गोपी कृष्णाला फार आवडत. त्यांत हिचें आद्यस्थान होते. गोपांगनांतील अष्टनायकांची नांवें:-राधा, चंद्रावली, श्यामला, शैब्या, पद्मा. ललिता, विशाखा व भद्रा. राधा सर्व गोपीत कृष्णाला अत्यंत प्रिय होती याविषयी प्रमाणः'सर्व गोपीषु सैवैका विष्णोरत्यंतवल्लभा' (पद्मपुराण). ही पूर्वजन्मींची इंद्रस्त्री शची होय. ही एकदा वैकुंठाला गेली असतां तेथें तिने लक्ष्मीनारायणाला अवलोकन केले आणि "या परमात्म्याच्या अर्धांगी जर मी बसेन तर माझ्या जन्माचे सार्थक होईल' असे तिने मनात आले