पान:केकावलि.djvu/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत विलोकुनि विलासिनीजन पुनःपुन्हा कामुका करी वश, नव्हे बुळा, विवश घेइना का मुका! ॥ १०१ . आहेत असा एक संस्कृत श्लोक देतो:-श्रृंगारी गिरिजानने, सकरुणो रत्यां, प्रवीरः स्मरे, बीभत्सोऽस्थिभिरुत्फणी च भयकृत् मूर्त्याद्भुतस्तुंगया । रौद्रो दक्षविमर्दने, च हसकृन्नमः, प्रशान्तश्चिरादित्थं सर्वरसाश्रयः पशुपतिर्भूयात्सतां भूतये ॥' [काव्यमाला-तृतीयगुच्छक-श्रीरुद्रभट्टकृत शृंगारतिलक-प्रथमपरिच्छेद.] ३. इतर, अन्य, शृंगाररसानभिज्ञ (पक्षी) पापी लोक. महाराष्ट्रकवींच्या ग्रंथांतून हा शब्द बऱ्याच ठिकाणी आढळतो. 'येर ते बापुडे काय रंक' [तुकाराम], 'येर गबाळाचे काम नाही' [तुकाराम]. १. शृंगाररसाभिज्ञा नायिका, शृंगारिक हावभावांत निपुण अशा वेश्या. 'विलोकुनि...करी वश' याचा अर्थः-कामशास्त्रांत प्रवीण अशा वेश्या नुसत्या आपल्या कटाक्षप्रेरणेनेंच (वांकड्या डोळ्यांनी पाहूनच) कामी पुरुषांना मोहित करितात. कारण ते रसिक असतात. हावभावः-प्रियपुरुषास पाहून कामकंदला स्त्रिया जे हावभाव करितात, त्यांचे वर्णन 'बृहत्संहितेत असें केलें आहे:-'स्नेहं मनोभवकृतं कथयंति भावा नाभीभुजस्तनविभूषणदर्शनानि । वस्त्राभिसंयमनकेशविमोक्षणानि भ्रूक्षेपकंपितकटाक्षनिरीक्षणानि ॥'. (वराहमिहिरकृत 'बृहत्संहिता' अ० ७८ श्लो० ३.) २. कामी पुरुषाला. स्त्रियांचे नेत्रकटाक्षः-शृंगाररसाची माधुरी कळणाऱ्या मनुष्यास स्त्रिया आपल्या सहज कटाक्षक्षेपणानेही वश करितात याविषयी वाचकांनी भर्तृहरीच्या 'शृंगारशतकां'तील पुढील श्लोक वाचावेत. 'भल्यांच्या मनोमंदिरामाजि तोच । विवेकप्रदीप स्फुरे स्पष्ट साच । तयातें कटाक्षांचलें जों न वारी । कुरंगेक्षणा यौवनोन्मत्त नारी ॥ ४९ ॥ सन्मागीं तोचि राहे, प्रभुपण मिरवी तोंच त्या इंद्रियांचें, । लज्जेते तोंचि वाहे, विनतपण निकें दावितो तोचि साचें, । भ्रूचापा ओढुनीयां श्रवणपथवरी मारिला नेत्रबाणीं । नाहीं जों कामिनींही पुरुष मिरवितो तोचि ही सर्व लेणी'. ॥ ५९॥ (ह. रिकृत शृंगारशतक वामनीभाषांतर.) ३. शृंगाररसानभिज्ञ पुरुष, नपुंसक, षंढ. हा शब्द पंतांनी इतरत्रही योजिला आहे. 'अथवा असेल दिसतो तैसा तरि परिभवें बुळा लाजो.' । (विराट ३. ८९), 'नव्हे बुळा...मुका' याचा अर्थः-पण नपुंसक त्या शृंगारचेष्टांनी मुळीच मोहित होत नाही, मग त्या विलासवती स्त्रिया त्याचे मुके कां घेईनात! विलासी स्त्रियांनी नपुंसकाला वश करण्यासाठी जरी आपली पराकाष्टा केली ह्मणजे जरी त्यांनी त्याचे चुंबन घेतले तरी तो त्यांना वश होत नाही. यांत त्या विलासिनी स्त्रियांकडे कांहीं दोष नसून उलट पंढाकडे मात्र अरसिकत्व येते. विलासिनी स्त्रियांचे चुंबन तर दूर राहो पण नुसत्या सहज कटाक्षक्षेपणानेच शृंगाररसज्ञ पुरुषांची गाळण उडते व शृंगारोद्दीपन होऊन त्यांच्या ठायीं अष्ट सात्विकभाव प्रकट होतात. . 'मुका' हा शब्द पंतांनी आपल्या काव्यांतून इतर ठिकाणीं योजिलेला आढळतो. 'प्राणा मुकेल इच्छुनि सिंहीचे गजहि सबहुमान मुके।' [विराटपर्व-अ० १ गी० १३८]. या केकेंतल्या द्वितीयार्धात दृष्टांतालंकार झाला आहे. येथे' कथा ह्या उपमेयाचे आणि विलासिनी ना.